अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेची धडक कारवाई ! गांजा विक्री करणारा तडीपार इसम ०९ किलो ४७८ ग्रम गांजा सह अंमली पदार्थ विरोधी पथकाचे ताब्यात”


पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626

अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा पिंपरी चिंचवड शहर

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये अंमली पदार्थांचे अवैध विक्रीवर आळा घालणे करीता व अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करणेबाबत आदेशीत केले आहे.

मा पोलीस उप आयुक्त, गुन्हे संदिप डोईफोडे, मा सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २, बाळासाहेब कोपनर यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखे कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संतोष पाटील यांनी अंमली पदार्थ विरोधी पथकातील सहा पोलीस निरीक्षक सचिन कदम, विक्रम गायकवाड, पोउपनि ज्ञानेश्वर दळवी व पोलीस अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करुन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थांचे अवैध विक्रीवर आळा घालणे करीता व अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करणेबाबत आदेशीत केले. सपोनि विक्रम गायकवाड, पोलीस अंमलदार किशोर परदेशी, मयुर वाडकर, गणेश कर्पे, विजय दौंडकर व निखिल वर्षे हे दिघी पोलीस स्टेशन हद्दीतील चहोली बु।। परिसरामध्ये पेट्रोलींग करीत असताना दाभाडेवस्ती, चहोली बु।। पुणे येथील दाभाडे सरकार चौकाचे जवळ असलेल्या श्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल समोर रस्त्याचे कडेला पोलीस अंमलदार विजय दौंडकर व गणेश करपे यांना एक इसम होंडा अॅक्टिवा या दुचाकी गाडीवर पुढील बाजुस पांढरे हिरवे रंगाचे नायलॉनचे पोते ठेवुन संशयीतरीत्या थांबलेला दिसला. त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव भरत दशरथ वाघमारे, वय ३९ वर्षे, रा मौजे राहु पिंपळगाव, ता दौंड जि पुणे असे असल्याचे सांगितले. त्याला तेथे थांबण्याचे कारण विचारले असता तो उडवाउडवीची उत्तरे देवु लागला. पोलीस अभिलेख तपासला असता भरत दशरथ वाघमारे हा गुन्हेगार असुन तो चाकण पोलीस स्टेशन येथुन तडीपार असल्याचे समोर आले. त्याचे वागणे संशयास्पद असल्याने त्याचेकडे अधिक चौकशी करुन त्याची झडती घेतली असता त्याचेकडे, त्याचेकडील पोत्यामध्ये ०९ किलो ४७८ ग्रम गांजा व होंडा अॅक्टिवा ही दुचाकी असा माल मिळुन आला तो पंचांसमक्ष जप्त करण्यात आला आहे. भरत दशरथ वाघमारे, वय ३९ वर्षे, रा मौजे राहु पिंपळगाव, ता दौंड जि पुणे याचे ताब्यात एकुण ५,३३,९००/- रुपये किंमतीचा ९४७८ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ व होंडा अॅक्टिवा ही असा माल मिळुन आल्याने त्याचे विरुध्द दिघी पोलीस स्टेशन येथे १४२/२०२५, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९४९ चे कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल

करण्यात आला आहे.
तडीपार इसम नामे भरत दशरथ वाघमारे याचेवर यापुर्वी पुढीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
१) चाकण पोलीस स्टेशन गु.र.क्र. २१५/२०२४ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब)
२) चाकण पोलीस स्टेशन गु.र.क्र. ५६२/२०२४ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब)
३) खडक पोलीस स्टेशन गु.र.क्र. ३९३/२०२८ पोस्को अॅक्ट कलम ४, ६, ८, १०

सदरची कारवाई मा. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड आयुक्तालय, मा. शशिकांत महावरकर, सह पोलीस आयुक्त, मा. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. संदिप डोईफोडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, मा. विशाल हिरे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे १, मा. बाळासाहेब कोपनर, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २ यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहा पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड पोउपनि पोलीस अंमलदार किशोर परदेशी, मयुर वाडकर, गणेश कर्पे, विजय दौंडकर, निखिल वर्षे व रमेश कारके यांचे पथकाने केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!