मॅट्रिमोनियल साईटवरुन महिलेला ३ कोटी ६० लाख रुपये रक्कमेला फसवणारा इंटरनॅशनल महाठग पकडण्यास पुणे सायबर पोलीसांना यश आले आहे.
पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
सायबर पोलिस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिल्ली मधील एक महिला ही पुणे खराडी भागामध्ये वास्तव्याला असताना तिने shaadi.com प्रोफाईलवर लग्नाकरीता प्रोफाईल तयार केलेला होता. तिच्या प्रोफाईलवर shaadi.com वरील प्रोफाईल नं. SH87341231 यावरुन ऑस्ट्रेलियन नागरीक (मुळ भारतीय) डॉक्टर रोहित ओबेरॉय नामक व्यक्तीने तिला सन २०२३ मध्ये मेसेज करुन ओळख वाढवुन, मैत्री करुन, त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवुन, तिचा विश्वास संपादीत केला. त्यानंतर पिडीत महिला आरोपी डॉ.
रोहित ओबेरॉय हे वेळोवेळी पुणे व भारतातील इतर ठिकाणी वास्ताव्याला एकत्रीत राहिले. पिडीत महिलेस तिच्या पहिल्या पतीकडुन फारकती द्वारे ५ कोटी रुपये पोटगी मिळालेली होती त्यामुळे पुढील भविष्यात पिडीत महिला ही शाळेमध्ये लहान मुलांकरीता Mindfullness and spirituality प्रोग्रॅम घेऊन त्याद्वारे व्यवसाय करणेकरीता प्रयत्नशील असताना तिच्याकडे मोठी रक्कम असल्याची माहिती आरोपी डॉ. रोहित ओबेरॉय यास माहित झाल्याने संधीचा फायदा घेऊन याने पिडीताला तो तिचा व्यवसाय आंतराराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाऊन व त्याकरीता फंडींग मिळुन देतो असा बनाव करुन इव्हॉन हँन्दयानी, विंन्सेंट कुआण या व्यक्ती सिंगापुरच्या असल्याचे सांगुन संगणमताने पिडीतास सीटी बँक सिंगापुर व भारतातील काही बँका यामध्ये वेळोवेळी ३,६०,१८,५४०/- रुपये रक्कम भरण्यास भाग पाडले. कालांतराने डॉ. रोहित ओबेरॉय हा ऑस्ट्रेलियाला गेला व त्याने पिडीतास बोलण्यास टाळाटाळ करुन त्याला तोंडाचा कॅन्सर झाल्याचे भासवुन तब्येत सतत खालावत असल्याचे सांगुन पिडीता सोबत कायमचा संपर्क बंद केला व सप्टेंबर २०२४ मध्ये त्याचा पार्टनर विंन्सेंट कुआण यांने पिडीतास एक ईमेल करुन त्यात डॉ. रोहित ओबेरॉय हा मरण पावला आहे असा मेसेज केला. तेव्हा पिडीताने सदरबाबत तिच्या मैत्रीणीला कळवली असता तिने हा फ्रॉड असु शकतो असे सांगितल्याने पिडीताने सर्व गोष्टी पडताळल्यावर पिडीतास खात्री झाली की, तिची डॉ. रोहित ओबेरॉय, इव्हॉन हँन्दयानी, विंन्सेंट कुआण यांनी आर्थिक फसवणुक केली आहे.
सदरबााबत पिडीताने नोव्हेंबर २०२४ रोजी तात्काळ एन.सी.आर.पी. पोर्टल १९३० यावर तसेच सायबर पोलीस ठाणे पुणे येथे संपर्क केला असता सायबर पोलीस ठाणे पुणे येथे डॉ. रोहित ओबेरॉय, इव्हॉन हँन्दयानी, विंन्सेंट कुआण यांचे विरुध्द गुन्हा रजि. नं.८०९/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३१९ (१), ३१९(२), ३१८(१),३१८ (२), ३१८(४) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (सी) अन्वये गुन्हा दाखल करुन तपासी अधिकारी वपोनि स्वप्नाली शिंदे यांनी तपास केला असता गुन्ह्यातील मिळुन आलेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषणद्वारे पिडीताला फसवणा-या व्यक्तीचे डॉ. रोहित ओबेरॉय नसुन त्याचे खरे नाव अभिषेक शुक्ला, मुळ राहणार लखनऊ, सध्या राहणार पर्थ, ऑस्ट्रेलिया असे निष्पन्न झाले तसेच आरोपी हा बाहेरील देशात असल्याची माहिती मिळाल्याने त्याचे नावाचे लुक ऑउट सर्क्युलर (LOC) तात्काळ जारी केले असता दि.२५/०६/२०२५ रोजी सदर आरोपी सिंगापुर वरुन मुंबईला आल्याची खबर मिळताच सायबर पोलीस तपास पथक पोउपनि सुशिल डमरे व स्टाफ यांनी मुंबई एअरपोर्टवर त्यास ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने अटक केलेली असुन सध्या आरोपी पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे.
सदर गुन्ह्याचा तपास करत असताना डॉ. रोहित ओबेरॉय उर्फ अभिषेक शुक्ला याने shaadi.com वर फेक प्रोफाईल तयार करुन एकुण ३,१९४ महिलांना मेसेज करुन संपर्क केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या आरोपीने आणखी किती महिलांना लग्नाचे आमिष दाखवुन आर्थिक गंडा घातला आहे याची माहिती घेण्याचे कामकाज सायबर पोलीस करीत आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री अमितेशकुमार सोो. पुणे शहर, मा. पोलीस सह आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा सोो, पुणे शहर, मा. अपर पोलीस आयुक्त श्री पंकज देशमुख सोो. (गुन्हे) पुणे शहर, मा. पोलीस उप-आयुक्त श्री विवेक मासाळ सोो., आर्थिक व सायबर पुणे शहर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री मच्छिंद्र खाडे, आर्थिक व सायबर पुणे यांचे मार्गदर्शनाखाली स्वप्नाली शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर, पोलीस उप-निरीक्षक सुशिल डमरे, पोहवा ७७८१ बाळासो चव्हाण, पोहवा ९२१ संदिप मुंढे, पोहवा ६९०७ नवनाथ कोंडे, पोहवा ६८५२ सतीश मांढरे, पोशि २६२७संदिप यादव, पोशि ८४३९ संदिप पवार, पोशि २५११ अमोल कदम, पोशि ९९०७ सचिन शिंदे सर्व नेमणुक – सायबर पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी सदरची कामगिरी केली आहे.
पुणे पोलीस दलाकडुन आव्हान –
१. मॅट्रिमोनियल साईट shaadi.com प्रोफाईल नं. SH87341231 यावरुन डॉ. रोहित ओबेरॉय नामक व्यक्तीकडुन महिलांची आर्थिक फसवणुक झाली असेल तर त्यांनी तात्काळ सायबर पोलीस ठाणे, पुणे शहर मो.नं. ७०५८७१९३७१/७५ यावर तपासी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांना संपर्क साधावा.
२. महिलांनी मॅट्रिमोनियल साईटवर लग्नाकरीता त्यांचे प्रोफाईल तयार केले असेल तर समोरील व्यक्तीने त्यांना त्याचे प्रोफाईल द्वारे संपर्क केला असता समोरील व्यक्ती बाबत शहानिशा करावी तसेच आर्थिक व्यवहार करताना सतर्कता बाळगावी.
3. मॅट्रिमोनियल साईटद्वारे महिलेला संपर्क साधलेला व्यक्ती हा बाहेर देशातील असल्याचे त्याने सांगितलेले असल्यास व तो भारतात आल्यावर त्याला कस्टम विभागाने पकडलेले आहे असे खोटे सांगुन त्याला सोडवण्यासाठी महिलांकडुन आर्थिक रक्कमेची मागणी करुन फसवणुक करत असतो. अशा खोट्या बतावणीला महिलांनी फसु नये / बळी पड्डु नये.
4. सायबर गुन्हा घडल्यास तात्काळ एन.सी.आर.पी. पोर्टल https://cybercrime.gov.in, १९३०, १९४५ यावर संपर्क साधावा.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव