महाराष्ट्र कारागृह विभाग राज्यस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा


पत्रकार :- विशाल धाकतोडे (पुणे ग्रामीण)

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- महाराष्ट्र कारागृह विभागामार्फत कारागृहातील अधिकारी/कर्मचारी यांचेकरीता राज्यस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. महाराष्ट्र कारागृह विभागाचे एकूण पाच विभाग असून विभागीय स्तरावरून विभागीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात. या विभागीय क्रीडा स्पर्धामध्ये ज्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे अथवा जे खेळाडू विजेते आहेत अशा खेळाडूंकरीता दरवर्षी मुख्यालय स्तरावरून वार्षिक क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात. सदर राज्यस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धा दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, येरवडा, पुणे येथे दिनांक १२.०२.२०२४ ते १६.०२.२०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या. या क्रीडा स्पर्धामध्ये ३०० खेळाडूंनी सहभाग घेतला. या क्रीडा स्पर्धामध्ये पुरूष व महिला खेळाडूंनी १०० मीटर धावणे, २०० मीटर धावणे, ८०० मीटर धावणे,रिले, थाळीफेक, भालाफेक, गोळाफेक, लांबउडी, कराटे, कुस्ती, बॅडमिंटन एकेरी, रिंगटेनिस एकेरी हे वैयक्तिक खेळ तसेच कबड्डी, व्हॉलीबॉल, रस्साखेच या सांघिक क्रीडा प्रकारात पुरूष व महिला खेळाडूंनी सहभाग घेतला.

पाच दिवस चाललेल्या या क्रीडा स्पर्धामध्ये अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सर्व खेळाडूंनी क्रीडा स्पर्धामध्ये सहभाग घेतला. मा. श्री. अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा यांचे संकल्पनेतून सन २०२४ या वर्षापासून क्रिकेट या खेळाच्या नव्याने समावेश करण्यात आलेला असल्याने पाचही विभागाच्या संघांनी अतिशय उत्साहाने या खेळात सहभाग घेतला.

Advertisement

महाराष्ट्र कारागृह विभाग राज्यस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा दिनांक १६.०२.२०२४ रोजी सायंकाळी ०५.०० वाजता मा. श्री. रितेश कुमार, महासमादेशक, गृहरक्षक दल, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या शुभ हस्ते तसेच मा. श्री. अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा व मा.डॉ. जालिंदर सुपेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक (मुख्यालय) यांच्या प्रमुख उपस्थितीत दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, येरवडा, पुणे येथे आयोजित करण्यात आला. महाराष्ट्र कारागृह राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर विभागाने सन २०२३-२४ या वर्षाचे विजेतेपद पटकावले असून सर्वोत्कृष्ट पुरूष खेळाडू म्हणून छत्रपती संभाजीनगर विभागाचे श्री सुनिल विठ्ठल काकरवाल तर सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून नाशिक विभागाच्या श्रीमती अनिता कैलास वाकचौरे यांची निवड करण्यात आली असून विजेत्यांना ट्रॉफी व रोख रुपये २१०००/- पारितोषिक देण्यात आले.

सदर बक्षिस वितरण कार्यक्रमाकरीता मा.श्रीमती स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक (पुणे विभाग), मा.श्री. योगेश देसाई, कारागृह उपमहानिरीक्षक (मुंबई विभाग), मा.श्री. यु.टी.पवार कारागृह उपमहानिरीक्षक (छत्रपती संभाजीनगर), श्री. नितीन वायचळ, प्राचार्य, दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय,श्री सुनिल ढमाळ, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे तसेच इतर मध्यवर्ती व जिल्हा कारागृहांचे अधीक्षक, सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच खेळाडू उपस्थित होते.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!