मुसळधार पावसामुळे मिठी नदी ओसंडून वाहू लागली


राजू अन्साराम उकांडे प्रतिनिधी मुंबई शहर

महा पोलीस न्यूज़ ! ऑनलाईन मुंबई :- मुंबईत झालेल्या अखंड मुसळधार पावसामुळे मिठी नदीला पूर आला असून ती ओसंडून वाहू लागली आहे. परिसरातील खालच्या भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. सायन, धारावी, कुर्ला, बांद्रा या भागांत पाण्याचा मोठा जमाव झाल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे.

Advertisement

महापालिकेने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून पाणी भरलेल्या रस्त्यांवरून जाणे टाळावे, असे सांगितले आहे. दरम्यान, एनडीआरएफच्या पथकांना सज्ज ठेवण्यात आले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीपात्र लगतच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.

हवामान विभागाने पुढील काही तासांत आणखी जोरदार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!