मा. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी एम.पी.डी.ए कायद्यान्वये केले स्थानबद्ध.


सुनील सांगळे पुणे प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय 
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे:-  मा. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, श्री. विनय कुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील दहशत माजवून गुन्हे करणारे, खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत, जबरी चोरी, गर्दी मारामारी करणे, तडीपारीचा आदेशाचा भंग करणारे, दुखापत, सदोष मनुष्यवध करणारे, खंडणी मागणारे गुन्हेगार, अग्निशस्त्रे व धारधार घातक शस्त्रे जवळ बाळगणे, अवैधरित्या दारु विक्री करणारे यांचा अभिलेख तपासुन त्यांचेवर परिणामकारक व कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेले असुन व्यापक प्रतिबंधक कारवाईचा आराखडा तयार केला आहे त्याप्रमाणे पोलीस स्टेशन स्तरावर कारवाई सुरु करण्यात आलेली आहे.
१) एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन हद्दीत वास्तव्य करणारा व एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन हद्दीत सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा पोहचविणारा, जबरी चोरी, अवैधरित्या दारु विक्री करणारा धोकादायक व अट्टल गुन्हेगार नामे प्रितम ऊर्फ शुभम राहुल राठोड वय २३ वर्षे रा. कुदळेवस्ती, मोशी, ता. हवेली, जि. पुणे. हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने जबरी चोरी, अवैधरित्या दारु विक्री करणे इ. सारखे ०८ गुन्हे केलेले आहेत. त्याचा स्थानबध्दतेबाबतचा प्रस्ताव पिंपरी चिंचवड आयुक्तालय येथे एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन येथून प्राप्त झाला होता.
२) चाकण पोलीस स्टेशन हद्दीत वास्तव्य करणारा व चाकण पोलीस स्टेशन हद्दीत सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा पोहचविणारा, धोकादायक व अट्टल गुन्हेगार नामे महेश बबन कड वय ३२ वर्षे रा. बापदेववस्ती, कडाचीवाडी, चाकण, पुणे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याचे साथीदारांसह खून, खंडणी मागणे, गर्दी मारामारी करणे, इ. सारखे ०५ गंभीर गुन्हे केलेले आहेत. त्याचा स्थानबध्दतेबाबतचा प्रस्ताव पिंपरी चिंचवड आयुक्तालय येथे चाकण पोलीस स्टेशन येथून प्राप्त झाला आहे.
३) काळेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत वास्तव्य करणारा व काळेवाडी, वाकड पोलीस स्टेशन हद्दीत सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा पोहचविणारा, धोकादायक व अट्टल गुन्हेगार नामे सौरभविकास साठे वय २२ वर्षे रा. सोमद्वार कॉलनी, रहाटणी, पुणे, हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याचे साथीदारांसह खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, खंडणी मागणे, तडीपारी आदेशाचा भंग करणे, अग्निशस्त्रे व धारधार घातक हत्यारे जवळ बाळगणे इ. सारखे ०८ गंभीर गुन्हे केलेले आहेत. त्याचा स्थानबध्दतेबाबतचा प्रस्ताव पिंपरी चिंचवड आयुक्तालय येथे काळेवाडी पोलीस स्टेशन येथून प्राप्त झाला आहे.
वरील तिनही प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन मा. पोलीस आयुक्त, श्री. विनय कुमार चौबे, पिंपरी चिंचवड यांनी वर नमुद इसमांचे विरुध्द एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारागृहात ०१ वर्ष कालावधीसाठी स्थानबध्दतेचे आदेश पारीत केलेले आहेत. त्याप्रमाणे १) प्रितम ऊर्फ शुभम राहुल राठोड वय २३ वर्षे रा. कुदळेवस्ती, मोशी, ता. हवेली, जि. पुणे. यास नाशिक रोड मध्यवर्ती कारगृह, नाशिक २) महेश बबन कड वय ३२ वर्षे रा. बापदेववस्ती, कडाचीवाडी, चाकण, पुणे यास नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपुर ३) सौरभ विकास साठे वय २२ वर्षे रा. सोमद्वार कॉलनी, रहाटणी, पुणे, यास अमरावती मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे स्थानबध्द करण्यात आले आहे.
मा. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी वरील प्रमाणे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. एम.पी.डी.ए. कायदयान्वये गुन्हेगारांना स्थानबद्धतेच्या सन २०२५ मध्ये एकूण २५ कारवाई करण्यात आलेल्या आहेत. तसेच मागील वर्षी सन २०२४ मध्ये देखील वरील प्रमाणे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. कायदयान्वये स्थानबध्दतेच्या एकुण ३२ कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यामुळे परिसरातील गुन्हेगारीत घट झालेली आहे. वरील प्रमाणे गुन्हेगारांवर केलेल्या कारवाईमुळे भविष्यातील गुन्हेगारी नियंत्रणात येणार आहे.
सदरची कामगीरीही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, मा. पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, मा.अपर पोलीस आयुक्त श्री. सारंग आवाड, मा. पोलीस उप आयुक्त (परि-२) विशाल गायकवाड, तात्कालीन मा. पोलीस उप-आयुक्त (परि-३) श्री.बापु बांगर, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. शिवाजी पवार, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे श्री. विशाल हिरे, मा. सहा पोलीस आयुक्त (चाकण विभाग) श्री. सचिन कदम, मा. सहा पोलीस आयुक्त (वाकड विभाग) श्री. सुनिल कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि श्री. गणेश जामदार (एमआयडीसी भोसरी पोस्टे), वपोनि श्री. संजय सोळुंके (चाकण पोस्टे), वपोनि श्री. राजेंद्र बहिरट (काळेवाडी पोस्टे) बपोनि श्रीमती रुपाली बोबडे (पी.सी.बी. गुन्हे शाखा) पोलीस अंमलदार सपोफौ सचिन चव्हाण, पोहवा व्यंकप्पा कारभारी (पी.सी.बी गुन्हे शाखा), पोहवा निलेश अरगडे (एमआयडीसी भोसरी पोस्टे), पोहवा तारु (चाकण पोस्टे), पोहवा रणधीर भोसले (काळेवाडी पोस्टे) यांच्या पथकाने केली आहे.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!