घोडेगाव पोलीसांनी मोटार सायकल चोराच्या मुसक्या आवळुन नाशिक येथुन चोरीची मोटार सायकल हस्तगत केली
विशाल धाकतोडे पुणे प्रतिनिधी
घोडेगाव पोलीस ठाणे पुणे ग्रामीण
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- घोडेगाव पोलीस ठाणे हद्दीतील मौजे शिनोली गावातुन दि. २६/०९/२०२५ रोजी फिर्यादी नामे गुलाम हुसेन युसुफ तांबोळी यांची मोटार सायकल अज्ञात आरोपीकडुन चोरीस गेली असलेबाबत घोडेगाव पोलीस ठाणे येथे गु र नं १६२/२०२५ भा.न्या.सं.२०२३ चे कलम ३०३(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नमुद गुन्हाच्या तपासादरम्यान सदरची मोटार सायकल चोरीस गेले घटनास्थळी घोडेगाव पोलीस ठाणेचे अधिकारी व अंमलदार यांचे तपास पथकाने भेट देवुन परीसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी तसेच तांत्रिक विश्लेषण करून स्थानिक नागरीकांकडे माहिती घेवुन तपास सुरू केला होता. सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान पोलीस अंमलदार अक्षय वायदंडे यांना गोपनीय बातमीदाराकडुन आरोपींबाबत माहिती प्राप्त झाली होती सदर माहितीचे अनुषंगाने पोलीस अंमलदार रवींद्र सुरकुले, सरला सुरकुले, बाळु सावंत, देविदास कुटे, निलेश तळपे, आशुतोष पानसरे, राम राठोड अशा तपास पथकाने मंचर, पारगाव, खेड, नाशिक येथे तपास करून आरोपी नामे गणेश उर्फ बाब्या परशुराम बोऱ्हाडे रा. शिनोली ता. आंबेगाव जि.पुणे याला ताब्यात घेवुन चोरीस गेलेली मोटार सायकल नाशिक येथुन हस्तगत करण्यात आलेली आहे. सदरचा गुन्हा नमुद आरोपी याचेसह विधीसंघर्षित बालक व पाहिजे आरोपी यांनी मिळून केलेला असुन विधीसंघर्षित बालकाकडे प्राथमिक तपास करून त्यास त्याचे पालकांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधिक्षक श्री. संदीप सिंग गिल सोो., मा.अपर पोलीस अधिक्षक श्री. रमेश चोपडे सोो., मा. उपविभागीय पोलीस अधिकारी खेड श्री अमोल मांडवे सो. यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली घोडेगाव पोलीस ठाणेचे श्री. सागर पवार सोो. सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक महेश पवार, पोलीस अंमलदार रवींद्र सुरकुले, सरला सुरकुले, बाळु सावंत, अश्वय वायदंडे, देविदास कुटे, निलेश तळपे, आशुतोष पानसरे, राम राठोड व इतर यांनी केली असुन अधिक तपास पोलीस हवालदार/रवींद्र सुरकुले हे करीत आहेत.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

