गुंडाने बांधकाम व्यावसायिकाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देऊन 2 लाखांची मागितली खंडणी…
पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
कोंढवा पोलिस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- पोलिसांना तू माझी टिप दिल्याने माझी जेल इंन्ट्री झाली, असे म्हणून गुंडाने बांधकाम व्यावसायिकाला मारहाण करुन २ लाख रुपयांची खंडणी मागितली, पैसे दिले नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली.
याबाबत जहीर मकसुद शेख (वय ४०, रा. दुराणी कॉम्पलेक्स, मिठानगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी रिझवान नईम मेमन (वय २४, रा. दुराणी कॉम्पलेक्स, मिठानगर, कोंढवा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जहीर शेख हे बांधकाम व्यावसायिक आहेत. रिझवान नईम मेमन व जहीर शेख हे एकाच सोसायटीत राहतात. जहीर शेख हे २२ ऑक्टोंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता कामानिमित्त सोसायटीच्या बाहेर पायी जात असताना रिझवान मेमन याने शेख यांना अडवून त्यांची कॉलर पकडली. “तुने मेरे बारे में पोलीस को टिप दिएला है, तेरे वजह से मेरे को जेल इंन्ट्री हो गई है” असे म्हणून हाताने कानाखाली व डोक्यात मारुन शिवीगाळ केली. लाथाबुक्क्यांनी मारहाण करु लागला. त्यावेळी जहीर शेख हे बचाओ, बचाओ असे ओरडू लागले. तेव्हा सोसायटीमधील लोक त्यांना वाचविण्यासाठी धावून आले.
रिझवान मेमन याने कमरेला असलेले लोखंडी हत्यार काढून लोकांच्या दिशेने रोखून “कोई आगे आया तो जिंदा नही छोडुंगा, जानसे मार दूंगा” अशी धमकी देताच सोसायटीतील लोक घाबरुन निघून गेले. रिझवान मेमन याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन धरुन हिसकाविण्याचा प्रयत्न केला. २
रुपये दे नाहीतर तुझा मर्डर करीन, अशी धमकी दिली. …मुळे जहीर शेख हे घाबरुन घरी पळून गेले. त्यानंतर मित्रांनी धीर दिल्यावर त्यांनी गुरुवारी त्यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक सुकेशिनी जाधव तपास करीत आहेत.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

