समर्थ पोलिस स्टेशनची दमदार कामगिरी ! रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून पिस्टल केले जप्त.
पंकेश जाधव संपादक 7020794626
समर्थ पोलीस ठाणे पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- दि.०८/१२/२०२३ रोजी समर्थ पोलीस ठाणेकडील तपास पथकातील अधिकारी व पोलीस अंमलदार हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस उप-निरीक्षक थोरवे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत इसम नामे सिद्दीक खान याचेकडे पिस्टल असुन तो रात्री समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत असणा-या सोमवार पेठ पोलीस चौकी शेजारील समर्थ व्यायाम मंदिरासमोर सोमवारपेठ येथे त्याचे मित्रास भेटण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
सदरची माहिती तात्काळ त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. सुरज बंडगर समर्थ पोलीस ठाणे यांना दिली. त्यावरुन त्यांनी पोलीस उप-निरीक्षक, थोरवे यांना स्टाफसह सदर ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे आदेशित केले. सदर ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक, थोरवे, अक्षयकुमार गोरड, सहा. पोलीस फौजदार, दत्तात्रय भोसले, पोलीस अंमलदार, प्रमोद जगताप, गणेश वायकर, हेमंत पेरणे यांनी सिध्दीक खान हा समर्थ व्यायाम शाळेसमोर त्याचे मित्रास भेटण्यासाठी आला असताना, त्यास स्टाफच्या मदतीने ताब्यात घेवुन त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव सिध्दीक रफिक खान, वय-२४ वर्षे, रा. गल्ली नं.२३, शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द, पुणे असे सांगितले. त्याची अंग झडती घेतली असता, त्याच्या उजव्या बाजुच्या कमरेस पॅन्टच्या आतमध्ये खोचलेला १ स्टिलचे पिस्टल मॅग्झीनसह मिळुन आले. तसेच पॅन्टच्या उजव्या खिशात गावठी पिस्टलचे १ काडतुस मिळुन आले. त्याचेकडून एकुण १०,२००/-रु.कि. चे पिस्टल व काडतुस जप्त करून समर्थ पोलीस ठाणे येथे गु.र.नं. २६३/२०२३ शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३)१३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर इसमावर यापूर्वी एक शरिरा विरुद्धचा गुन्हा दाखल आहे.
सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, श्री प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, पुणे, श्री. संदिपसिंह गिल, मा. सहा. पोलीस आयुक्त फरासखाना विभाग, पुणे, श्री. अशोक धुमाळ, समर्थ पो स्टे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. सुरज बंडगर, पोलीस निरीक्षक, (गुन्हे), श्री. प्रमोद वाघमारे यांचे मार्गदर्शनानुसार तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक, सुनिल रणदिवे, पोलीस उप निरीक्षक, सौरभ थोरवे, अक्षयकुमार गोरड, दिपक यादव व सहायक पोलीस उप निरीक्षक, दत्तात्रय भोसले, पोलीस अंमलदार, प्रमोद जगताप, गणेश वायकर, संतोष डमाले, रोहीदास वाघेरे, रहीम शेख, हेमंत पेरणे, अमोल शिंदे, म. पोलीस अंमलदार वैशाली परदेशी व रागिनी शिंदे यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

