भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपूर्ण कामगिरी ! अट्टल घरफोड्या करणाऱ्या सराईत चंद्रपाटलेकडुन : घरफोडीचे गुन्हे उघड
पंकेश जाधव संपादक 7020794626
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक ०६/०२/२०२४ रोजी १४.४५ वा ते १६.०० वा च्या दरम्यान फलॅट नं ५०६ फेज नं १, मंगलम सोसायटी, सोपानकाका नगर, गुजरवाडी रोड, कात्रज, पुणे ४६ येथे फिर्यादी मारुती थिटे यांचे घराचे दरवाज्याचे कुलुप कोणीतरी अज्ञात चोरटयाने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून फिर्यादीचे घरातील किं रु १,४६,२५०/- रु चे सोन्याचे दागिने चोरून केले त्याच कालावधीमध्ये सदर चोरट्याने फिर्यादीचे बिल्डींगमधील महेंद्रसिंग प्रतापसिंग परमार, रा फलॅट नं ५०१ मंगलम फेज १ सोपानकाका नगर कात्रज पुणे यांचे फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केलेला आहे. तसेच सदर चोरटयाने सह फिर्यादी राकेश मांगीलाल चीधरी, वय २७ वर्षे धंद्दा हार्डवेअर शॉप, रा. फलेंट नं १०२ वि थिंग ओग्नेस्ट बिल्डींग गुजरवाडी रोड गणेश चौक कात्रज पुणे, हर्षल अनिकेत ढमाले, चय २४ वर्षे, रा रा फलेंट नं एम १ चि चिंग ओरनेस्ट बिल्डींग गुजरवाडी रोड गणेश चौक कात्रज पुणे व दिलीप ज्ञानोबा फणसे, चय ३८ वर्षे चंद्दा ड्रायव्हर रा फलेंट नं एस २, ए विंग ओरानेस्ट बिल्डींग गुजरवाडी रोड गणेश चीक कात्रज पुणे यांचे बंद घराचे कुलूप तोडून २,३१७,५००/- रुचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केले म्हणुन फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन भारती विद्यापीट पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १२१/२०२४, भादंवि कलम ४५४,३८०,५११ गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीताचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व
अंमलदार हे शोध घेणेकरता गुन्हयाचे घटनास्थळाचे तसेच आजुबाजुचे ठिकाणाचे सीसीटीव्ही कॅमेरांद्वारे पाहणी करीत असताना एक संशयीत इसम घटनास्थळावर दिसुन आला. त्या संशयीत इसमाचा पोलीस अंमलदार हर्षल शिंदे ,धनाजी धोत्रे, सचिन गाडे यांनी घटनास्थळ खोपडेनगर या ठिकाणापासुन राजगुरुनगर, खेड, लोणावळा, व वडगाव मावळ या ठिकाणापर्यंतचे सुमारे ३०० सीसीटीव्ही कॅमेरांद्वारे पाहणी केली असता त्यांना सदरचा संशयीत इसमाचे नाव सुदर्शन विष्णुकांत चंद्रपाटले, वय ३० वर्षे, रा. सध्या रा.रामचंद्र भिलारे यांचेकडे भाड्याने, दिग्विजय कॉलनी, ता. मावळ, जि.पुणे मुळ गाव मु.पो बडगळ नागनाथ, ता.चाकुर, जि. लातुर याने केला असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्याने लागलीच तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सदरचा आरोपीचा शोध घेत असताना तो बडगाय मावळ या ठिकाणी मिळून आल्याने त्यास नमुद गुन्हयात दिनांक १२/०२/२०२४ रोजी १७.१५ वा अटक केली आहे.
आरोपीचे पोलीस कस्टडी दरम्यान त्याचेकडुन खालील प्रमाणे ५ घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आले असुन त्याचेकडुन ५६ ग्रॅम वजनाचे एकुण १,२७,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
१. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे गुन्हा रजि नंबर १२१/२०२४, भादंवि कलम ४५४,३८०,५११
२. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे गुन्हा रजि नंवर ११५/२०२३, भादंवि कलम ४५४
३. हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १०१/२०२४, भादंवि कलम ४५४,४५४,३८०
४. चतुश्रृंगी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ९४०/२०२३ भांद्रिय कलम ४५४,४५७,३८०
५. चतुश्रृंगी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ९३२/२०२३ भांदवि कलम ३८०
आरोपी सुदर्शन चंद्रपाटले हा रेकार्डवरील हिस्ट्रीशीटर असुन त्याचेवर सुमारे ३५ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्याने आणखीन कोणते गुन्हे केले आहेत का याचा तपास चालु आहे.
सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. प्रविण पवार राह आयुक्त, पुणे शहर, मा. प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. श्रीमती स्मार्तना पाटील सगो गा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. नंदीनी चग्याणी साो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस.पाटील, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगल मोडवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार थनाजी धोत्रे, हर्षल शिंदे, सचिन गाडे, सचिन सरपाले, अवधुत जमदाडे, अभिनय चौधरी, निलेश खैरमोडे, सतिश मोरे, शैलेश साठे, चेतन गोरे, निलेश जमदाडे, महेश बारवकर, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.
(डी.एस.पाटील)

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

