हातभट्टी दारु तयार करणाऱ्यांविरद्ध जेजुरी पोलीसांची धडक कारवाई, १२२५लीटर तयार गावठी दारु व १०,००० लीटरचे कच्चे रसायन असे एकुण ५,२४,००० रु. ची दारु जप्त.


पत्रकार  :- विशाल धाकतोडे पुणे ग्रामीण 

जेजुरी पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे  :- दिनांक ०४.०३.२०२४ रोजी ००:१५ वा चे सुमारस जेजुरी पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे, हे पोलीस स्टेशनला हजर असताना यांना गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहीती मिळाली की, ढोलेवाडी गावचे हद्दीत इसम नामे संतोष राठोड हा नाझरे धरणाचे कडेला शेतात विहीरीजवळ आडोशाला गावठी हातभट्टीची दारु तयार करण्याची भट्टी तयार करत आहे.

Advertisement

बातमीच्या अनुषंगाने आम्ही दोन पंचांना बोलावुन घेवुन, पंचासह व पोलीस स्टाफसह शासकीय वाहनाने जावुन बातमी मिळाली ठिकाणी छापा टाकला असता हातभट्टीची दारु तयार करण्यासाठी भटी चालु असल्याचे दिसुन आले. सदर ठिकाणी ०२ लोखंडी पातेले, त्यामध्ये गावठी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे १०,००० लीटर कच्चे रसायन, ३५ लीटरचे निंळे रंगाचे प्लास्टीकचे ३५ कॅन्ड त्यामध्ये १,२२५ लीटर तयार गावठी हातभट्टी दारु, १० मन लाकडी सरपण, काळा गुळ प्रत्येकी ०१ किलो वजनाचे सुमारे १२० ढेपा, एकुण १,२०० किलो, ०१ जर्मनचा चाटु त्यास नळी असलेला, ०१ जर्मनची थाळी असा माल व तयार दारु असा एकुण ५,२४,०००/- रु. किमतीचा माल मिळून आला, कच्चे रसायन व जळके रसायन, लाकडी सरपण साहीत्य असे जागीच नाश करण्यात आला आहे, गावठी हातभट्टी दारु मानवी आराग्यास अपायकारक आहे हे माहीती असुनही दारु तयार करणरा इसम संतोष राठोड हा पोलीसांची चाहुल लागताच पळुन गेला. सदरबाबत जेजुरी पालीस स्टेशन गु.र नं. ९२/ २०२४ भादवी ३२८ सह दारुबंदी अधिनीयम १९४९ कलम ६५ फ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील, जेजुरी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

सदरची कारवाई ही मा. श्री. पकंज देशमुख, पोलीस अधिक्षक सो, पुणे ग्रमीण, मा. श्री. संजय जाधव, अपर पोलीस अधिक्षक, बारामती, मा. श्री. श्रीकांत पाडुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, भोर विभाग सासवड यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक श्री. दिपक वाकचौरे, पोलीस उपनिरीक्षक, महेश पाटील, पो. हवा./ २०१७ अण्णासाहेब देशमुख, पो. शि. १७१४ प्रविण शेडे, होमगार्ड/ ३९६५ खंडागळे यांचे पथकाने केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!