गुन्हे शाखा, यूनिट-५ व यूनिट ६ ची संयुक्त कामगिरी ! सराईत चोरटा मुद्देमालासह जेरबंद…


संपादक :- पंकेश जाधव 7020794626

गुन्हे शाखा युनिट ५ व युनिट ६ पुणे शहर

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :-मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे आदेश व सुचनाप्रमाणे गुन्हे शाखेकडील युनिट-५ व युनिट-६ कडील अधिकारी व अंमलदार असे दि. ११/०३/२०२४ रोजी हडपसर पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हेगार चेकींग तसेच गुन्हे प्रतिबंध गस्त करीत असताना पथकातील पोलीस अंमलदार नितीन मुंढे व प्रमोद टिळेकर  यांना बातमी मिळाली की, एक सराईत चोरटा त्याचेकडे चोरीचे मोटार सायकल असुन तो विविध ठिकाणीहुन चोरी केलेले मोबाईल विक्रीसाठी चंदवाडी, फुरुसंगी या भागात येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली.

सदर बातमीच्या अनुषंगाने युनिट प्रभारी पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांनी सोबतच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांचेसह बातमीच्या ठिकाणी चंदवाडी रोडला असणारे दत्त मंदिराजवळ आलो. सदर ठिकाणी ठिकाणी बातमीच्या वर्णनाप्रमाणे एक संशयित इसम मोटार सायकलवर संशयितरित्या जात असताना दिसल्यावर त्यास पोलीसांनी इशारा करुन थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने पोलीसांना पाहताच त्याचेकडील मोटार सायकलसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी त्यास पोलीसांनी शिताफीने नोटार सायकलसह ताब्यात घेतले. त्याचे निहालसिंग मन्नुसिंग टाक उर्फ शिखलकर, वय १९ वर्षे, रा. स.नं. ४. तुळजाभवानी वसाहत, गाडीतळ, हडपसर, पुणे असे असल्याचे सांगीतले. त्याचेकडील ताब्यातील मोटार सायकलबाबत माहिती घेता ती हडपसर पोलीस ठाणे येथील चोरीच्या गुन्हयातील असल्याचे निष्पन्न झाले. यावरुन सदर इसमाकडे पोलीसांनी कोशल्यपुर्ण तपास करुन त्याने त्याचे इतर साथीदारासह वानवडी व बडकी भागात दोन घरफोडी चोरी केल्याचे सांगुन पुणे शहरात विविध ठिकाणी मोबाईल जबरी चोरी, वाहन चोरी व मोबाईल चोरी असे एकुण ०९ गुन्हे केल्याचे सांगुन एकुण ०४ मोटर सायकली, ०४ मोचाईल फोन व विदेशी चलन असा एकुण २,६८,७५०/-कि. चा ऐवज जप्त करणेत आलेला आहे. आरोपी याचेकडुन खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

Advertisement

१. विश्रामबाग पो.स्टे.गु.र.नं. ४३/२०२३ भा. द. वि. कलम ३७९

२. सहकारनगर पो.स्टे.गु.र.नं. ५८/२०२४ भा.द.वि.कलम ३७९

३.हडपसर पो.स्टे. गु.र.नं. ३४७/२०२३ भा.द. वि. कलम ३७९ .

४.लोणी काळभोर पो.स्टे. गु.र.नं.०२/२०२४ भा.द. वि. कलम ४५४,३८०,

५. हडपसर पो.स्टे. गु.र.नं. ४३६/२०२४ भा.द. वि. कलम ३९२.३४

६. हडपसर पो.स्टे. गु.र.नं. ४३५/२०२४ भा.द. वि. कलम ३९२,३४

हडपसर पो.स्टे.गु.र.नं. ४३७/२०२४ भा.द. वि. कलम ३७९

८ . वानवडी पो.स्टे.गु.र.नं. ११३/२०२४ मा.द. वि. कलम ४५७,३८०,३४

९. हडपसर पो.स्टे.गु.र.नं. १७५/२०२४ मा.द. वि. कलम ३७९

 

सदरची उल्लेखनिय कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेशकुमार, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. प्रविण पवार, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. शैलेंद्र बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त, श्री. सतिश गोवेकर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहा. पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस अंमलदार रमेश साबळे, प्रमोद टिळेकर, अकबर शेख, दया शेगर, नितीन मुंढे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, ऋषिकेश ताकवणे, शेखर काटे, प्रतिक लाहीगुडे, पांडुरंग कांबळे, संजय दळवी, स्वाती गावडे यांनी केलेली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!