ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे बंद्यांकरिता ,स्मार्ट कार्ड दुरध्वनी सुविधा, वॉशिंग मशिन,दुरदर्शन संच ,ई मुलाखत युनिट, आयुष्यमान भारत कार्ड, श्रमीक कार्ड उदघाटन कार्यक्रम.


पंकेश जाधव संपादक 7020794626

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- कारागृहात दाखल बंद्यांना कारागृहातील नियमानुसार त्यांच्या कुटुंबियांशी/वकीलाशी संवाद होण्याकरीता मुलाखत, कॉईन बॉक्स, व्हिडीओ कॉन्फरन्स,गळाभेट इत्यादी सुविधा पुरविण्यात येत होत्या परंतू कारागृहात क्षमतेपेक्षा सरसरी पेक्षा जास्त बंदी दाखल असल्याने प्रचलित सुविधा देण्यात मर्यादा येत होत्या तसेच काळानुरुप आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन कारागृहातील सर्वांना बंद्यांना त्याच्या कुटुंबियांशी/वकीलाशी संवाद साधण्याकरीता यामध्ये सुधारणा होणे आवश्यक होते.याचा सर्वकक्ष बाबींचा आढावा घेऊन मा.श्री.अमिताभ गुप्ता, मा.अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा,महाराष्ट्र राज्य,पुणे यांनी कारागृहातील बंद्यांकरीता तमिळनाडू कारागृहाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील सर्व कारागृहात दाखल बंद्यांकरीता तमिळनाडू स्थित ॲलन ग्रुप,कंपणीच्या सहाय्याने बंद्यांकरीता स्मार्टकार्ड सुविधा सुरु केलेली आहे.

दि.12.03.2024 रोजी ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये बंद्याकरीता स्मार्टकार्ड दुरध्वनी सुविधा,वॉशिंग मशिन, दुरदर्शन संच,ई मुलाखत युनिट इत्यादीचे उदघाटन व आयुष्यमान भारत कार्ड, श्रमीक कार्ड चे वितरण मा. श्री.अहमद जावेद, पोलीस आयुक्त/ पोलीस महासंचालक (निवृत्त), भारताचे सौदी अरेबियातील माजी राजदूत यांचे शुभहस्ते व मा. श्री.अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य ,पुणे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडलेले आहे. सदर उद्घाटन कार्यक्रमाकरिता मा.श्री. योगेश देसाई,कारागृह उपमहानिरीक्षक, दक्षिण विभाग, मुंबई व श्रीमती राणी भोसले,अधीक्षक,ठाणे मध्यवर्ती कारागृह आणि इतर अधिकारी व कर्मचारी हे उपस्थित होते.

Advertisement

ठाणे मध्यवर्ती कारागृहात सध्यसिथतीत सरासरी 4200 पुरुष बंदी व 133 महिला बंदी दाखल असून सर्व विभागातील बॅरेक च्या बाहेरील बाजूस ॲलन ग्रुप,कंपणी द्वारे 20 नग स्मार्टकार्ड दुरध्वनी संच बसविण्यात येऊन फोन सुविधे करीता आवश्यक स्मार्ट कार्ड पुरविण्यात आलेले आहे. स्मार्टकार्ड मध्ये बंद्यांचे नातेवाईक व वकील यांचे एकूण 03 फोन क्रमांक जतन केलेले असतील त्या मोबाईल क्रमांकावरच बंदी स्मार्टकार्डद्वारे कॉल करु शकनार आहेत. स्मार्टकार्डच्या माध्यमातून ज्या बंद्यांच्या फोन नंबरची पडताळणी झालेली आहे,अशा सर्व बंद्यांना आठवडयातून तीनवेळा प्रत्येकी 06 मिनीटे देण्यात येणार असून सदर फोन सुविधेकरीता बंद्यांना प्रति मिनीट 01 रुपये प्रमाणे शुल्क ठेवण्यात आलेले आहे.स्मार्टफोन सुविधेमुळे बंद्यांना त्यांच्या कुटुंबियांशी व वकीलशी संवाद साधण्यात सुलभता येऊन बंद्यांना निश्चित फायदा होणार आहे.त्याच प्रमाणे कारागृहातील बंद्यांना कपडे स्वच्छेकरीता मा.मुख्यालयाकडुन बंद्यांचे स्वत:चे वापराचे कपडे धुण्यासाठी 05 नग वॉशिंग मशीन व कपडे सुकविण्याकरीता 05 ड्रायर मशीन पुरविण्यात आलेले आहेत. कारागृहात दाखल असलेल्या बंद्यांचे मनोरंजनोकरीता टि.व्ही. सुविधेमध्ये दुरदर्शन चॅनेलशिवाय 4 वेगवेगळे स्पोर्ट चॅनेल तसेच मराठी /हिंदी /इंग्रजी बातम्यांचे प्रत्येकी चार चॅनेल तसेच ॲनिमल प्लॅनेट इ. चॅनेल सुरु करणेस परवानगी देण्यात आलेली आहे.त्यानुसार ठाणे मध्यवर्ती कारागृहास,मा.मुख्यालयाकडुन 75 इंची 03 नग , 50 इंच -15 नग, 43 इंची 10 नग टि.व्ही. व 55 इंची टि.व्ही. 10 नग इ. अशा एकूण 38 नग दुरदर्शन संच पुरवठा करण्यात आलेला आहे. ज्या बंद्यांचे नातेवाईक प्रत्यक्ष भेटी करीता येऊ शकत नाही अशा बंद्यां करीता ई मुलाखत सुविधा सुरु करण्यात आलेली आहे, ई मुलाखत करीता 10 व्ही.सी.संच कार्यान्वयित करण्यात आलेले आहेत.सदर सुविधेमार्फत बंद्यांना नातेवाईक भेटीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

भारत सरकारची आयुष्मान भारत योजनेअंतर्गत कारागृहातील पात्र बंद्यांची ऑनलाईन नोंदणी सुरु करण्यात आलेली असून या योजनेअंतर्गत रुपये 05 लक्ष पर्यंत वैद्यकीय उपचार कवच उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.सदर योजनेअंर्गत लाभार्थी बंद्यांना आयुष्मान भारत कार्ड चे वाटप करण्यात आले.

कामगार मंत्रालयांतर्गत श्रमिक कार्ड नोंदणी अंतर्गत कारागृहातील बंद्यांची नोंदणी करुन बंद्यांना कामगार मंत्रालयांतर्गत दोन लक्ष रुपयांचा अपघात विमाचा लाभ देण्यात येत आहे.या अतर्गत बंद्यांची नोंदणी करुन ई श्रम कार्डचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!