अमरावती मध्यवर्ती कारागृह येथील उडाण केंद्र येथे बंदी इस्त्री विभागाचे उदघाटन


पंकेश जाधव संपादक 7020794626

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे:- दि.03/04/2024 बुधवार:- मा. श्री.अमिताभ गुप्ता,अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा,महाराष्ट्र राज्य,पुणे यांचे प्रेरणेने अमरावती मध्यवर्ती कारागृहातील खुल्या कारागृहातील बंद्याना शेती कामासोबत इतरही प्रकारचे रोजगार उपलब्ध व्हावे या हेतूने अमरावती कारागृह प्रशासनाचे वतीने कारागृहाचे वडाळी रोड स्थित उडाण, कौशल्य विकास केंद्र येथे इस्त्री विभागाचा उदघाटन सोहळा संपन्न झाला. सदर विभागाचे उघाटन मा.डॉ.जालिंदर सुपेकर (भा.पो.से), विशेष पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे शुभ हस्ते करण्यात आले. सदर उद्घाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री.यु.टी.पवार, कारागृह उपमहानिरीक्षक, छ.संभाजीनगर उपस्थित होते, तर कारागृहाचे वतीने श्रीमती किर्ती चिंतामणी, कारागृह अधीक्षक, श्री. संजय गुल्हाने, वरीष्ठ तुरुंगाधिकारी, श्री.मिलिंद बन्सोड, वरीष्ठ तुरुंगाधिकारी, श्री.उमेश गुंडरे, तुरुंगाधिकारी, श्री.मनोहर भोसले, तुरुंगाधिकारी उपस्थित होते

Advertisement

सर्वप्रथम प्रमुख उद्घाट्क तथा अतिथी यांचे श्रीमती किर्ती चिंतामणी, अधीक्षक, अमरावती मध्यवर्ती कारागृह यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तदनंतर इस्त्री विभागाचे मा.डॉ.जालिंदर सुपेकर (भा.पो.से), विशेष पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले. सदर इस्त्री विभागाचे मार्फत सामान्य जनतेस कपडे धुलाई व इस्त्री अशा सुविधा अत्यंत माफक दरात उपलब्ध करुन दिल्या जाईल तसेच प्राप्त अर्थाजनातून बंद्याना रोजगाराचे संधी उपलब्ध होऊन बंदी सुधारणेस मदत होणार असल्याने या स्तुत्य व नाविण्यपुर्ण उपक्रमाबाबत डॉ.सुपेकर यांनी अमरावती कारागृह प्रशासनाचे कौतूक केले व अश्याचे प्रकारचे सुधारणावादी उपक्रम राबविण्याबाबत मार्गदर्शन केले. खुले कारागृहातील बंद्याना शेती विभागातच कामे उपलब्ध करुन दिल्या जात होती परंतू शेती विभागातील कामे मर्यादित असल्याने बंद्याना अधिकाधिक नियमित रोजगार उपलब्ध व्हावे व त्यातून त्यांना अर्थप्राप्ती होऊन बंद्यामध्ये सुधारणेची भावना निर्मान होऊन त्यांचे पुनर्वसन होणेकरिता मदत होईल अशी प्रतीक्रिया श्रीमती किर्ती चिंतामणी, अधीक्षक, अमरावती मध्यवर्ती कारागृह यांनी दिली. सदर इस्त्री विभागाचे उद्घाटन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.उमेश गुंडरे, तुरुंगाधिकारी, श्री.ललित मुंडे, तुरुंग शिक्षक, श्री.संजय घोलप, तुरुंग शिक्षक यांचेसह हवालदार श्री.अशोक जाधव, कारागृह शिपाई श्री.राहूल पंधरे, श्री.रामेश्वर मुदगुले, श्री.क्रिष्णा सांभारे, श्री.अतुल सलामे, महिला शिपाई शुभांगी सुवासार, दिक्षा राठोड, लिलाबाई सावलकर इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!