कोंढवा पोलिस स्टेशन हद्दीतील पोक्सो मधील एका संशयीत आरोपीची केली निर्दोष मुक्तता….
पंकेश जाधव संपादक 7020794626
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- कोंढवा येथील संशयीत आरोपी रामदेव शर्मा यांना कोंढवा हद्दीतील अल्पवयीन दोन मुली यांच्यावर शारीरिक छळ केल्या प्रकरणी,भा द वी कलम 376 ,354, पोक्सो कलम 3,4,5 (एल),(एम),(एन),(पी)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. शाळेत घेण्यात येणाऱ्या गुड टच बॅड टच या प्रकरणावरून आरोपी यांच्यावर संशयीत आरोपी म्हणून कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली गेली. व आरोपी यालाअटक झाली.
आरोपी यांना मे. कोर्टाने दोषारोपपत्र दाखल करून सदर खटला चालवण्याचा हुकूम बजावण्यात आला. आरोपी यांनी ॲड. शैलेश बेरे-पाटील यांच्याकडे धाव घेतली असता, आरोपीचे वकील सदर केस चालवण्याचा निर्णय घेतला, सदर केस चालवीत असताना , आरोपी विरुद्ध कोणतेही सबळ पुरावे आढळून आले नसल्याने ॲड. बेरे-पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायालय पुणे यांनी आरोपी याची निर्दोष मुक्तता केली.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

