भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्युपर्ण कामगिरी ! जमीनीच्या वादातून खून करुन पसार झालेल्या आरोपीस शिताफीने अटक…
पंकेश जाधव संपादक 7020794626
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक ०५/०५/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजणेच्या सुमारास कात्रज ते नवले ब्रीजकडे जाणारे रोडवर, दत्तनगर बस स्टॉपजवळ हायवेलगत, आंबेगाव बुद्रुक पुणे येथे दोन अनोळखी इसमांनी कोणत्यातरी अज्ञात कारणासाठी फिर्यादी यांचे वडील विलास जयवंत बांदल, वय ५५ वर्षे यांचे डोक्यात, तोंडावर दगड व वीट घालुन त्यांना जिये दार मारले आहे म्हणुन फिर्यादी अभिषेक विलास बांदल, वय २४ वर्षे, धंदा शिक्षण, रा. त्रिमुर्ती रेसीडेन्सी, फर्नेट नंबर २४, वंडरसिटी जवळ, कात्रज पुणे मुळ गाव मु.पो. पिसावरे, ता. भोर, जि. पुणे यांनी दिले तक्रारीवरुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३८०/२०२४, भादंवि कलम ३०२,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, अभिनय चौधरी, सचिन गाडे यांनी घटनास्थळ ते दत्तनगर, तसेच कात्रज हायवेवरील सर्व आस्थापनांचे सी.सी.टी.व्ही कॅमेरे चेक करुन तसेच गोपनीय बातमीदारामार्फतीने माहीती घेतली असता नमुद गुन्हयातील मयत इसम विलास जयवंत बांदल यास त्याचा मित्र संतोष ऊर्फ पप्पु पाबेकर, वय ४५ वर्षे, रा. संतोषनगर, कात्रज, पुणे याने जमीनीच्या वादातुन जिये ठार मारले आहे.
सदर आरोपी कोणताही मोबाईल फोन वापरत नसल्यामुळे आरोपीस पकडण्यास अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे आरोपीस पकडण्यासाठी मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस. पाटील यांनी चार वेगवेगळ्या टीम तयार करुन आरोपीताचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे नमुद आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे यांना आरोपीत हा रावडी, ता. भोर, जि. पुणे या गावात त्याचे नातेवाईकांना भेटण्यासाठी आला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम, सचिन गाडे यांनी रावडी, ता. भोर,जि.पुणे येथे जावुन शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन गुन्हयात अटक केली आहे.
सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर, मा.प्रविण पवार साो, सह आयुक्त, पुणे शहर, मा. प्रविणकुमार पाटील साो, अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. श्रीमती स्मार्तना पाटील साो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. नंदीनी वग्याणी साो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री डी.एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे, अभिनय चीथरी, सचिन सरपाले, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, अवधतु जमदाडे, शैलेश साठे, नामदेव रेणुसे, चेतन गोरे, महेश बारवकर, निलेश जमदाडे, निलेश ढमढेरे, हनमंत मासाळ, हर्षल शिंदे, विक्रम सावंत, राहुल तांबे, यांच्या पथकाने केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

