पुण्यातील उरुळी कांचन पोलिस स्टेशन हद्दीतील भागात येथे खुलेआम गुटखा विक्री , गावठी दारू व मटका सुरू! कुणाच्या आशीर्वादाने चालले आहेत हे ……
पत्रकार :- विशाल धाकतोडे पुणे ग्रामीण
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- महाराष्ट्रात गुटखा विक्री बंदीचा नियम शासनाने दहा वर्षांपूर्वी लागू केला आहे. उरुळी कांचन परीसरातील गुटखा विक्री जोमात सुरू आहे. बंदी लागू झाली तेव्हा छुप्या मार्गाने होणारी गुटखा विक्री आता तर खुलेआम होत आहे. तसेच मटका आणि गावठी दारू विक्री ( जय मल्हार रोड ,बाजार पेठ समोर ) विक्री चालू असून, यांना उरुळी कांचन पोलीसांच्या खाकीचा धाक राहिला नसल्याची वास्तव चित्र येथे खुलआम पाहण्यास मिळत आहे. मटका धंदा चालक राजू जाधव आणि गावठी दारू विक्री तात्या कदम नामक व्यक्ती व त्यासारखे असे कीतेक जण उरुळी कांचन येथे विक्री मोट्या प्रमाणात करतात.
उरुळी कांचन परिसरातील बहुतांश पानटपरी आणि किराणा दुकानांमध्ये गुटख्याची विक्री होत आहे.परराज्यातील नागरिकांची या व्यवसायातील संख्या लक्षणीय आहे. कायम गर्दी असल्यामुळे येथे गुटखा विक्रीची उलाढाल जास्त प्रमाणात होते. आधी गुटखा विक्री , गावठी दारू आणि मटका धंदा करणारे या धंद्यात तरबेज झाल्याने गब्बर झाले आहेत.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

