वानवडी पोलिस स्टेशन मधील सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाडवर कोयत्याने हल्ला


पंकेश जाधव संपादक 7020794626

वानवडी पोलिस स्टेशन पुणे शहर

Advertisement

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- पुणे शहरात गुन्हेगारांनी उच्छाद माजवला असून कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. पुणे शहरातील वानवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षकावरच थेट कोयता हल्ला झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. वानवडी हद्दीतील सय्यद नगर शेजारील पेट्रोल पंपालगत रस्त्यावर वाहन अपघात झाला असताना भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयता हल्ला झाला आहे.

सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड असे जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.

आज रोजी दुपारी 16/00 वा. चे सुमारास न्यू रॉयल ऑटो गॅरेज च्या समोर ससाणे नगर रेल्वे गेटच्या जवळ एका मोटरसायकल चालक व मागे बसलेले इसम यांची मोटरसायकल वरील इसम नामे निहाल सिंग मन्नू सिंग टाक व त्याच्या बरोबरील एक अनोळखी इसम यांच्यामध्ये वाद चालू असल्याने व इग्नेटर वरील निहालसिंग मन्नू सिंग टाक व त्याच्या बरोबरील अनोळखी मुलगा हे होंडा एक्टिवा वरील इसमांना मारहाण करत असल्याने व त्यांच्याकडे कोयता असल्याने तेथून जाणारे वानवडी पोलीस स्टेशन कडील एपीआय रत्नदीप गायकवाड हे त्यांची गाडी थांबवून भांडणे सोडवण्यासाठी व नमूद इग्नेटर वरील इसमांकडून कोयता काढून घेण्यासाठी त्यांचे जवळ जात असताना इग्नेटर वरील इसम नामे निहालसिंग मन्नू सिंह टाक याने त्याच्याकडील कोयता एपीआय रत्नदीप गायकवाड यांना फेकून मारला.

तो कोयता त्यांचे डोक्यात लागला असून, एपीआय रत्नदीप गायकवाड यांचे डोक्यात गंभीर जखम झाली आहे. तसेच नमूद कोयता मारणारा इसमनामे निहाल सिंग मनसिंग टाक व त्याचे बरोबरील अनोळखी साथीदार हे दोघेही तेथून पळून गेले आहेत.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!