बॉलिवूड अभिनेता गोविंदा याच्या पायात गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे..स्वतःच्या हातातून चुकून झाडण्यात आली गोळी


कुणाल घोडके कार्यकारी संपादक 9860394949

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन:- बॉलिवूड अभिनेता गोविंदा (60) याच्या पायात गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे. त्याच्याच रिव्हॉल्व्हर मधून त्याने गोळी झाडली. मंगळवारी पहाटे ४.४५ च्या सुमारास ही घटना घडली. ऑपरेशननंतर त्याच्या पायातली गोळी काढण्यात आली आहे. अभिनेता सध्या धोक्याबाहेर आहे.

पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी सांगितले की, घटना घडली तेव्हा गोविंदा घरात एकटाच होता. त्याच्याकडे परवानाधारक रिव्हॉल्व्हर आहे. रिव्हॉल्व्हरने चुकून गोळी झाडली, जी त्याच्या पायाला लागली. याप्रकरणी कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. या प्रकरणात संशयास्पद काहीही नाही.

Advertisement

रिव्हॉल्व्हर साफ करताना गोविंदाला गोळी लागल्याने गोविंदाला गोळी लागली. मुंबई पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्याचे रिव्हॉल्व्हर जप्त केले.

गोविंदा धोक्याबाहेर

मिळालेल्या माहितीनुसार, गोळी लागल्याने त्याच्या पायातून खूप रक्तस्त्राव झाला होता. त्यांना उपचारासाठी अंधेरीच्या कृती केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक उपचारानंतर गोविंदाची प्रकृती धोक्याबाहेर आहे. त्यांची पत्नी सुनीता सध्या त्यांच्यासोबत रुग्णालयात आहे. एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते कोलकात्याला जाणार होते…


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!