मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे कडील खुनाच्या गुन्हयातील तिन आरोपीचा २४ तासाच्या आत बिबवेवाडी पोलीसांनी शोध घेण्यात यश
पत्रकार इमरान शेख
बिबवेवाडी पोलिस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- सदरबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक ०२/१०/२०२४ रोजी रात्रौ ०९/०० वा.चे सुमारास सावित्री हॉटेलचे समोर शेड मध्ये व येवले चहाचे समोर मार्केटयार्ड पुणे येथे यातील बाळासाहेब रणदिवे व्हॉटसअॅपवर पाठवलेल्या मेसेजमुळे आरोपी नामे राहुल दत्तात्रय खुडे, त्याचा भाऊ सचिन दत्तात्रय खुडे, एक सरदारजी व आणखी एक अज्ञात आरोपी यांनी हातात स्टीलचे कोयते घेऊन घटनास्थळी येवून दहशत निर्माण करुन बाळासाहेब रणदिवे यास कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले व उपचारा दरम्यान मयत झालेने मार्केटयार्ड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे.
सदर दाखल गुन्हयातील आरोपींचा शोध घेणेबाबत मा. वरिष्ठांनी सुचना दिलेनंतर सदर नमुद आरोपींचा तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक श्री अशोक येवले, पोलीस अमंलदार हे, मा. पोलीस उप आयुक्त श्री आर राजा, परिमंडळ ५ पुणे शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे शहर, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती मंगल मोढवे, पोलीस निरीक्षक गुन्हे मनोजकुमार लोंढे यांचे मार्गदर्शनाखाली व त्यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे शोध घेत असताना पोलीस अमंलदार सुमित ताकपेरे यांना बातमी मिळाली की, सदरचे आरोपी हे कात्रज घाटाचे दिशेने सातारा निघून जाणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळालेने मिळालेल्या बातमीवरून बिबवेवाडी पोलीस ठाणे तपासपथकातील अधिकारी व अमंलदार यांनी कात्रज घाटात सापळा रचून आरोपी नामे १) राहुल दत्तात्रय खुडे, वय ४० वर्षे, रा. डायस प्लॉट गुलटेकडी पुणे.२) सचिन दत्तात्रय खुडे, वय ३४ वर्षे रा. सदर ३) सुरजसिंग दिलीपसिंग दुधानी, रा.सदर यांना कात्रज घाटातून पाठलाग करून ताब्यात घेवून पुढील कारवाईकामी मार्केटयार्ड पोलीस ठाणे पुढील तपासाकरिता देण्यात आलेले आहे. अधिक तपास मार्केटयार्ड पोलीस ठाणे पुणे शहर हे करीत आहेत. वरील नमुद आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांचे यापुर्वी देखील खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री अमितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा, मा.अप्पर पोलीस आयुक्त श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त श्री आर राजा, परिमंडळ ५ पुणे शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ट पोलीस निरीक्षक मंगल मोढवे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री मनोजकुमार लोंढे, तपासपथकातील अधिकारी पोलीस उप निरीक्षक श्री अशोक येवले, पोलीस हवालदार संजय गायकवाड, संतोष जाधव, पोलीस अमंलदार सुमित ताकपेरे, प्रणय पाटील, आशिष गायकवाड, विशाल जाधव, शिवाजी येवले, प्रणय पाटील, ज्योतिष काळे, अभिषेक धुमाळ, यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

