सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाची कौतुकाशपद कामगिरी ! बनावट चलनी नोटा बाळगणारा आरोपी जेरबंद


पंकेश जाधव संपादक 7020794626

सहकारनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर.

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि.०८/१०/२०२४ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. छगन कापसे यांचे आदेशाने सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे सहकारनगर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पुणे सातारा रोडवरील प‌द्मावती बसस्टॉपसमोर आलो असताना पोलीस अंमलदार अमोल पवार व महेश मंडलीक यांना एक इसम गडबडीने स्वारगेटचे दिशेने जावु लागल्याचा दिसला त्याचा संशय आल्याने त्याचा पाठलाग करुन त्यास पकडुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव निलेश हिरानंद विरकर वय ३३ वर्षे व्यवसाय नोकरी रा. विष्णु गावडे चाळ रेल्वे रिझर्व्हेशन सेंटर जवळ चिंचवड स्टेशन समोर चिंचवड पुणे असे सांगितले सदर इसमास तेथुन गडबडीत निघुन जाण्याचे कारण विचारता तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला. त्याचेकडे विचारणा करीत असताना तो त्याचे पॅटचे डावे खिशात सारखा हात घालुन काहीतरी लपवीत असल्याचे दिसल्याने व त्याचा संशय आल्याने त्याचे खिशात ५००/-रुपये किमतीच्या नोटांचे एक बंडल मिळुन आले.

त्याबाबत त्यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांने सदरच्या नोटा नकली असुन त्या रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवुन नकली नोटा चलनात चालविण्यासाठी जवळ बाळगल्या होत्या असे सांगीतले. सदरच्या नोटा नकली असल्याची सदर इसमाने कबुली दिल्याने सदर बाबत सहकारनगर पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पालीस निरीक्षक श्री. छगन कापसे यांना कळविली असता त्यांनी लागलीच सदर ठिकाणी हजर राहुन सदरबाबत खात्री करुन सुचना व मार्गदर्शन करून कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले त्यानुसार सदर आरोपीचे ताब्यातुन ५००/-रुपये दराच्या एकुण २५० नकली चलनी नोटा गुन्हयाचे पुरावेकामी जप्त करण्यात आल्या असुन सहकारनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ३३९/२०२४ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम १८० प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कामगीरी मा.अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री. प्रविणकुमार पाटील मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ-२, पुणे शहर श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे श्रीमती नंदिनी वग्यानी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहकारनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर श्री. छगन कापसे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. उत्तम भजनावळे यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पो.स्टे. चे तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहा. पोउपनिरी बापु खुटवड
व पोलीस अंमलदार अमोल पवार, महेश मंडलिक, किरण कांबळे, सागर सुतकर, अभिजीत वालगुडे, चंद्रकांत जाधव, बजरंग पवार, अमित पदमाळे, खंडु शिंदे, योगेश ढोले, महेश भगत, महादेव नाळे, सागर कुंभार यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!