पुण्यात भारी ! पुणे सायबर पोलीस ठाण्याची कामगिरी ..आरोपी सानिया सिद्दीकी उर्फ गुड्डीया फरीदाबाद मधुन घेतले ताब्यात


पंकेश जाधव संपादक 7020794626

सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर 

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे:– सायबर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ७२/२०२४ भारतीय दंड विधान संहिता कलम ४१९,४२० सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (सी), ६६ (डी) मधील आरोपी सानिया सिद्दीकी उर्फ गुड्डीया हिस फेब्रुवारी २०२४ मध्ये सायबर पोलीस ठाणेच्या पथकाने फरीदाबाद मधुन ताब्यात घेतले असताना पुणे कडे रेल्वेतुन प्रवास करताना कोटा रेल्वे स्टेशन येथुन पळुन गेलेली सायबर ठगी सानिया उर्फ गुड्डीया मोहम्मद मुस्तकीम साहब सिद्दीकी वय २१ वर्षे रा- वॉर्ड नं.११/१२, लोहरपत्ती, थावे गोपालगंज, बिहार हिस दिनांक १५/१२/२०२४ रोजी पुणे सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोउपनिरी संदिप कदम, मपोहवा सिमा सुडीत, पोशि संदिप पवार यांनी वेशांतर करुन लोहरपत्ती, थावे गोपालगंज, बिहार येथिल तिच्या घराजवळ सापळा रचुन अथक प्रयत्नातुन शिताफीने पकडले.

सायबर पोलीस ठाणे येथे फेब्रुवारी, २०२४ येथे पुणे शहरातील नामाकिंत बिल्डर बोलतो असे सांगुन संबंधित कंपनीच्या अकाऊंटंट व्यक्तिद्वारे नामाकिंत बिल्डरच्या खात्यातुन एकुण ४,०६,१७,३१६/- रुपयांची आर्थिक फसवणुक केली म्हणुन सायबर पोलीस ठाणे येथे गु.र.नं.७२/२०२४ भारतीय दंड विधान संहिता कलम ४१९,४२० सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 (सी) 66 (डी) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची महिला आरोपी सायबर ठगी सानिया उर्फ गुड्डीया मोहम्मद मुस्तकीम साहब सिद्दीकी पळुन गेल्यानंतर स्वतःचे अस्तित्व लपवुन वेगवेगळे मोबाईल नंबर वापरुन राहत होती. सुमारे ०१ वर्षापासुन ती फरार असल्यामुळे मा. पोलीस आयुक्त सोो. पुणे शहर यांनी सदर गुन्ह्याचा स्वतः आढावा घेऊन त्याबाबत मार्गदर्शन केले सायबर तपास पथकाने दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचे गुन्ह्याच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषण करुन सदर सायबर ठगी महिला दिल्ली येथे असल्याचे माहिती मिळाल्याने मा. पोलीस उपआयुक्त श्री विवेक मासाळ, आर्थिक व सायबर, गुन्हे शाखा पुणे यांनी सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोउपनिरी संदिप कदम, मपोहवा सिमा सुडीत, मपोहवा निलम साबळे, पोशि संदिप पवार, पोशि सचिन शिंदे यांना गुन्ह्याच्या तपासकामी तात्काळ दिल्ली येथे रवाना केले. सदर तपास पथकाने न्यु दिल्ली येथिल स्थानिक पोलीसांच्या मदतीने जामीयानगर भागात सायबर ठगी सानिया उर्फ गुड्डीया हिचा शोध घेतला तेथिल महत्वाची माहिती तसेच पोलीस शिपाई अश्विन कुमकर याला सिवान बिहार येथिल बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीत सानिया उर्फ गुड्डीया हि गोपालगंज भागात असल्याची खात्रीशीर माहिती मिळुन आल्याने तपास पथकाने तात्काळ क्षणाचा विलंब न करता दिल्ली ते गोपालगंज, बिहार गाठले. तेथे गुप्त बातमीदार व इतर महत्वाच्या माहिती द्वारे सायबर ठगी सानिया उर्फ गुड्डीया ही राहत असलेल्या लोहरपत्ती, थावे गोपालगंज याठिकाणी वेशांतर करुन जवळच्या शेतात रात्रभर दबा धरुन बसुन तिच्या राहत घरात प्रवेश केला असता ती राहते घराच्या छतावरुन उडी मारुन पळुन जात असताना तिस शिताफीने पकडुन तिस अटक करण्यात आली आहे.

सायबर पोलीस स्टेशन यांनी सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री अमितेशकुमार सो. पुणे शहर, मा. पोलीस सह आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा सोो, पुणे शहर, मा. अपर पोलीस आयुक्त श्री शैलेश बलकवडे सोो. (गुन्हे) पुणे शहर, मा. पोलीस उप-आयुक्त श्री विवेक मासाळ सोो., आर्थिक व सायबर पुणे शहर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री मच्छिंद्र खाडे, आर्थिक व सायबर पुणे, श्री सुरेश शिंदे, वपोनि, सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली स्वप्नाली शिंदे, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर, पोलीस उप-निरीक्षक संदिप कदम, पोहवा ६०७८ सिमा सुडीत, पोहवा ६२६८ निलम साबळे, पोहवा ९२१ मुंढे, पोहवा कोंडे, पोशि. ८४३९ संदिप पवार, पोशि ९९०७ सचिन शिंदे, पोशि.१०१०७ दिनेश मरकड, पोशि अश्विन कुमकर, पोशि १०७१६ नागटिळक, पोशि स्वागत पळसे, यांनी सदरची कामगीरी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!