तासगांव तालुक्यातील वायफळे मर्डर प्रकरणातील तीन आरोपीला बिबवेवाडी पोलिसांनी घेतले ताब्यात. तपास पथक याची जोरदार कामगीरी
आकाश पांचाळ सह संपादक 9762631042 महा पोलीस न्यूज! ऑनलाईन पुणे:-
तासगांव पोलीस ठाणे गुरन नं ५५९/२०२४ विएनएस कलम १०३(१).१०९(१), १८९(२),१११(२).१९१(३).१९०, आर्म अॅक्ट ४,२५,२७ प्रमाणे दाखला असून, दाखल गुन्हयात तासगांव तालुक्यातील वायफळे येथील रोहित संजय फाळके माच्यावर गुरुवारी सायंकाळी सहा वाजता विशाल सज्जन फाळके याने व त्याचे साथीदारांसह कोयता आणि तलवारीने हल्ला केला होता त्यात ओंकार ऊर्फ रोहित फाळके हा जागीच ठार झाला होताः तर वडील संजय फाळके आई जयश्री फाळके, आदित्य साठे आशिष साठे आणि सिकंदर अरे पाचजण जखमी झाले होते. तालुक्यातील वायफले येचोल ओंकार ऊर्फ रोहित संजय फाळके याच्या खून प्रकरणी तासगाव पोलिस व सांगलीच्या स्थानिक गन्हे अन्वेषण शाखेच्या टिम या आरोपीच्या शोधात पुणे येथे थांबून होत्या. तरी बिबवेवाडी पोलीस ठाणेचे पो.शी समित ताकपेरे पोशी प्रणय पाटील यांना गोपनीय बातमी दारा मार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील तिन आरोपी है गैस गोडाउन विबेवाडी येथे थांबून असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने, त्यानी तात्काळ तपास पथकाचे प्रमुख पो.उप-निरी अशोक येवले याना कळवले असता, त्यानी सदर बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शंकर साळुंखे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनोजकमार लोंढे यांना कळवले. त्यांनी तात्काळ ताब्यात घेण्याबाबत आदेशित केल्याने, आम्ही आरोपीच्या शोधात आलेले तासगाव पोलीस वण्याचे सहा.पो निरी. पवार. व पथक याना घेवुन मिल्वालेोल्या बातमीप्रमाणे खात्री केली असता, गैस गोडाउन २७६ ओटा बिबेवाडी येथे तीन इसम अंधारात चांबल्या बाबत दिसून आल्याने वर नमूद तपास पथकाच्या मदतीने त्यांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांची नावे विचारली असता, त्यांनी त्यांची नावे अनुक्रमे. १) राहल सरेश बळेकर वय १८ वर्ष रा. पापल वस्ती बिवेवाडी पुणे २) अनिकेत संतोष खुळे वय १९ रा. खोपडे नगर कात्रज तलावाजवळ कात्रज पणे. ३) आकाश महिपत मळेकर वय वीस वर्षे व्यवसाय व्यापार मार्केट यार्ड येथे रा. पापल बस्ती बिबेवाड़ी पुणे. असे असल्याचे सांगितले त्यांना वर नमूद गुन्हाबाबत विचारणा केली असता, त्यां तिघांनी कबुली दिल्याने त्यांना ताब्यात घेऊन विबेवाडी पोलीस ठाणे येथे घेऊन येऊन, डायरी करून तासगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री अमितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा, मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त श्री राजकमार शिंदे, परिमंडळ ५ पुणे शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री मनोजकुमार लोंढे, तपासपथकातील अधिकारी पोलीस उप निरीक्षक श्री अशोक येवले, पोलीस हवालदार संजय गायकवाड, संतोष जाधव, पोलीस अमंलदार सुमित ताकपेरे, प्रणय पाटील ज्योतिष काळे, शिवाजी येवले, आशिष गायकवाड, प्रणय पाटील, अजय कामठे, पांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

