हिंजवडी गुन्हे शोध पथकाची कामगीरी ! गावठी बनावटीचे पिस्टल व काडतुस बाळगणारा हिंजवडी पोलीसांच्या जाळयात


बालाजी शिंदे पुणे जिल्हा प्रतिनिधी 

हिंजवडी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर 

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त सो. पिंपरी चिंचवड यांनी अवैध शस्त्रे बाळगणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करुन तसेच गोपनीय माहिती काढुन विना परवाना शस्त्रे बाळगणारे यांचेवर कारवाई करणेबाबत आदेशीत केल्याने, दि. १३/१२/२०२४ रोजी हिंजवडी पोलीस ठाणे कडील गुन्हे शोध पथकातील सहा. पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ हे सपोफौ नरेश बलसाने, पोलीस अंमलदार कुणाल शिंदे, कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे, रवि पवार व विशाल भोईर असे हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध शस्त्रे शोध व कारवाईकामी पेट्रोलिंग करीत असताना सपोफौ नरेश बलसाने यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मारुंजी रोड ताथवडे पुणे येथे एक इसम गावठी पिस्टल घेऊन येणार आहे अशी बातमी मिळाल्याने सपोफौ नरेश बलसाने यांनी सपोनि सोमनाथ पांचाळ, यांना कळविले, सपोनि सोमनाथ पांचाळ यांनी सदर बातमीचा आशय प्रभारी अधिकारी हिंजवडी पोलीस ठाणे यांना कळवुन .

सदर बातमीची खात्री करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने गुन्हे शोध पथकाने बातमीप्रमाणे सापळा लावुन जावडेकर यांची सुपर नोवा साईटजवळ मारुंजी रोड ताथवडे पुणे येथे इसम नामे रोहीत फुलनाथ भालशंकर वय २० वर्षे रा. रुम नं. ०५ दादा शितोळे यांची चाळ अण्णाभाऊ साठेनगर कासारसाई पुणे. मुळ रा. स.नं.१३३ आंबील ओढा, सिंहगड रोड दांडेकर पुल पुणे. यांस शिताफीने ताब्यात घेवून पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात गावठी लोखंडी पिस्टल व दोन राऊंड मिळून आल्याने त्याचेवर हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं. १३८८/२०२४ हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (३) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर आरोपीस अटक करण्यात आली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अशोक दुधवणे हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा. श्री. विनय कुमार चौबे साो, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. शशिकांत महावरकर सोो. सह पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री. वसंत परदेशी सो. अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. विशाल गायकवाड, व मा. श्री. बापु बांगर पोलीस उप आयुक्त परि.२, पिंपरी चिंचवड, मा. श्री. सुनिल कुऱ्हाडे सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग पिं चिं यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे, पोलीस निरीक्षक श्री. ऋषीकेश घाडगे, तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ, श्रेणी पोलीस उप निरीक्षक अशोक दुधवणे, पोलीस अंमलदार, नरेश बलसाने, कैलास केंगले, कुणाल शिंदे, विजय गेंगजे, प्रशांत गिलबिले, कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे, रवि पवार, विशाल भोईर, परिमंडळ २ ऑफिसचे मंगेश लोखंडे यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!