फुकट वडापाव दे असे सांगून जबरी चोरी करणारा पाहीजे आरोपी बिबवेवाडी पोलीसांच्या जाळ्यात
पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- सदरबाबत अधिक माहिती अशी की, दि. ०६/०३/२०२५ रोजी रात्रौ ०९/४५ वा. चे सुमारास महादेव वडेवाले, बी ४८, सुपर बिबवेवाडी पुणे येथे फिर्यादी यांचे दुकानाजवळ त्यांचे ओळखीचा भारत बडगुजर हा त्यांचे महादेव वडापावचे दुकानात येऊन फुकट वडापाव दे असे बोलून दमदाटी केली असता फिर्यादी यांनी वडापाव न दिल्याने फिर्यादी यांना दुकानाचे बाजूला बोलावून घेवून धक्काबुक्की व शिवीगाळ करून फिर्यादी यांचे खिशातील २२००/- रु. जबरदस्तीने घेऊन गेला म्हणून दि. ०७/०३/२०२५ रोजी फिर्यादी यांनी कायदेशिर तक्रार दिली असता बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ५२/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ३५२, ३५१(२) प्रमाणे गुन्हा दाखल झाला असता मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो. यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक साो. (गुन्हे) यांचे मौखिक आदेशान्वये दाखल गुन्ह्यतील पाहीजे आरोपी नामे भारत राजेश बडगुजर, वय ३७ वर्षे, रा. सी/३/२६, दुर्गामाता गार्डन जवळ, सुप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे याचा पोलीस उपनिरीक्षक येवले, पोहवा १२८६ गायकवाड, पोशि १००१९ ताकपेरे, पोशि.८६०१ येवले, पोशि ५९६१ काळे असे शोध घेत असताना दि. १८/०३/२०२५ रोजी पोलीस शिपाई १००१९ ताकपेरे यांना त्यांचे बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार खात्री करून अंबामाता मंदिर, सुखसागर नगर, बिबवेवाडी, पुणे येथून आरोपी नामे भारत राजेश बडगुजर, वय ३७वर्षे, रा.सी/३/२६, दुर्गामाता गार्डन जवळ, सुप्पर इंदिरानगर बिबवेवाडी पुणे यास ताब्यात घेवून पोलीस स्टेशन येथे आणून त्याचेकडे दाखल गुन्ह्यातील जबरी चोरी केलेल्या रकमेबाबत तपास केला असता ती त्याने मौजमजेसाठी खर्च केलेबाबत सांगितले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री अमितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा, मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त श्री राजकुमार शिंदे, परिमंडळ ५ पुणे शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री सुरज बेंद्रे, तपास पथकातील अधिकारी पोलीस उप निरीक्षक श्री अशोक येवले, पोलीस हवालदार संजय गायकवाड, संतोष जाधव, पोलीस अमंलदार ज्योतिष काळे, रक्षित काळे, शिवाजी येवले, विशाल जाधव, आशिष गायकवाड, सुमित ताकपेरे, प्रणय पाटील, दत्ता शेंद्रे यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

