पोलिसांच्या नावाने खंडणी उकळणारा वकील पोलिसांच्या जाळ्यात….


पंकेश जाधव संपादक 7020794626

बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे शहर 

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- बंडगार्डन पोलीस ठाण्यात एका वकिलाविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघात प्रकरणात अडकलेल्या तरुणाच्या वडिलांकडून पोलीस, न्यायालय आणि कारागृह अधिकाऱ्यांच्या नावाखाली पैसे उकळल्याप्रकरणी अॅड. निलेश यादव (३०) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

फिर्यादी पवनकुमार सिंघल (५०) यांचा मुलगा, जो गुडगावमध्ये आयटी इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे, त्याच्यावर डिसेंबरमध्ये पुणे स्टेशन परिसरात एका महिला वाहतूक पोलिसाला कारने धडक दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात आरोपी वकिलाने विविध बहाण्यांनी फिर्यादीकडून एकूण पाच लाख रुपये उकळले.

वकिलाने प्रथम मुलाच्या मित्र-मैत्रिणींना अटकेपासून वाचवण्याच्या नावाखाली दोन लाख रुपये घेतले. त्यानंतर कारागृहातील व्हीआयपी बेरेकसाठी ५० हजार रुपये आणि जामीन प्रक्रियेसाठी अडीच लाख रुपये वसूल केले. शिवाय न्यायाधीशांच्या मध्यस्थीसाठी १२ लाख रुपयांची मागणी केली.

फिर्यादी सिंघल यांना संशय आल्यानंतर त्यांनी पोलीस उपायुक्त कार्यालयात चौकशी केली असता वकिलाने केलेली फसवणूक उघडकीस आली. यानंतर त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात खंडणीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!