सायबर फसवणुकीसाठी बँक खात्याचे रॅकेट चालवणाऱ्या ०६जणांना परराज्यातून अटक.
पुणे ब्युरो चिफ -डॅनियल ॲनथोनी ८७९६२७३९४५
साइबर पोलिस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर
महा .पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे:- पुणे परिसरात सायबर फसवणुकीसाठी लागणारे बँक खात्याचे रॅकेट चालवणाऱ्या झारखंड ,गुजरात ,उडीसा येथील ०६ आरोपीना सायबर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे .या आरोपी विरुद्ध भारतभर १०२तक्रारी असल्याचे दिसून येत असून आंतरराष्ट्रीय सायबर टोळीला असे हजारो बँक खाते दिल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर येत आहे.
१)शुभम मोहन लोंढे (वय २४ वर्ष ,रा.गोसावीनगर राम मंदिराजवळ ,पाटील नगर चिखली )२)सॅम उर्फ डेव्हिड उर्फ संबीधकुमार श्रीपती नायक (वय २२वर्ष रा.डी ११२,सेक्टर नंबर १४ राऊलकिला ,उडीसा .३)राज अंश सिंग संतोषसिंग (वय २१वर्ष रा.संगीता हाईटस फ्लॅट नंबर ३०४,भूगाव ,मूळ पत्ता बेहेरी हनुमान चौक ,हनुमान मंदिरासमोर हजारीबाग झारखंड ४)प्रोफेसर उर्फ हिमांशुकुमार गणेश ठाकूर (वय २४वर्षे रा. विलेज खुद्द ,पोस्ट रेवली ,हजारीबाग झारखंड) ५)गौरव अनिल कुमार शर्मा वय ४० वर्ष ,रा. राजन नगर सोना कॉम्प्लेक्स फ्लॅट नंबर १०२,बी विंग ,वलसाड ,गुजरात )६)अंकुश रामराव मोरे (वय ३१,वर्ष रा.डी २,४०२,सेरीन मेडोज ,गंगापूर ,खेड नाशिक) केलेल्याची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांना वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरून आरोपी यांनी ऑनलाइन व्हाटसग्रुप वर ऍड केले होते .फिर्यादी यांना लिंक करून अप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगून त्यांच्या बँक खात्यातून एकूण ०७ लाख ६० हजार ऑनलाईन भरण्यात भाग पडले .नंतर आरोपींनी रक्कम परत न करता फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली .या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस हवालदार खरात यांना माहिती मिळाली की चिखलीतील शुभम लोंढे हा सायबर गुन्हेगारासाठी वापरणारे बँक खाते देण्याचे काम करीत आहे सायबर सेल पोलिसांनी हा धागा पकडत सॅम उर्फ डेव्हिड याची माहिती घेतली तो बँक खात्याची माहिती कंबोडिया येथील मुख्य आरोपीसा देत होता .सायबर पोलिसांनी मोठ्या सिताफिने हिंजवडी परिसरातून आरोपी सॅम उर्फ डेव्हिड याला ताब्यात घेतले .त्याच्याकडे चौकशी करून इतर आरोपींना पकडण्यासाठी दोन स्वतंत्र पथक तयार करून तांत्रिक विश्लेषणाद्वारे मोठ्या शिताफीने आरोपींना ताब्यात घेण्यात आले.शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना सेबी पुरस्कृत एप्लीकेशन चा वापर करावा असे आव्हान पोलिसांकडून करण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे ,सह आयुक्त डॉ,शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी ,पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे ,सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ.विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवीकिरण नाळे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी ,उपनिरीक्षक सागर पोमण, वैभव पाटील ,प्रकाश कातकाडे, पोलीस अंमलदार हेमंत खरात ,दीपक भोसले ,श्रीकांत कबुरे ,विशाल निचीत ,स्वप्नील खपाले,सुभाष पाटील ,नितेश बिचेवार,अतुल लोखंडे, प्रिया वसावे ,प्रितम भालेराव ,सरिता तुपे ,धरती वाडेकर ,ईश्वरी आंबरे, मोनिका चित्तेवार ,महेश मोटकर,सूरज शिंदे ,टेकाळे ,सुरंजन चव्हाण ,दिपाली टोपे, दिपाली चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

