गजा मारणे टोळीतील कुख्यात पाहिजे आरोपी रुपेश मारणे यांस केले जेरबंद


पंकेश जाधव मुख्य संपादक ७०२०७९४६२६
कोथरुड पोलीस स्टेशन, पुणे शहर.
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे:  कोथरुड पोलीस स्टेशन कडील गु.र.नं. ४६/२०२५ भा.न्या.सं.क.१०९, ११८ (१), ११८ (२). १२६(२),१११(२), ३(५) या गुन्हयात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम ३(१) (ii), ३(४) अन्वये दि.१९/०२/२०२५ रोजी गजानन मारणे व त्याचेटोळी सदस्याविरुध्द गुन्हा दाखल असून नमुद टोळीप्रमुख आरोपी गजानन मारणे याने त्याचे साथीदारांसह स्वतःचे, गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी सुतारदरा, कोथरुड पुणे व परिसरामध्ये दहशत केली असुन संघटित्तपणे व वैयक्तीकपणे खुनाचा प्रयत्न, घरफोडी चोरी, गंभीर दुखापत करणे, नागरीकांच्या मालमत्तेचे नुकसान करणे, घातक शस्त्राव्दारे जखमी करणे, बेकायदेशीर घातक शस्त्र जवळ बाळगणे, शातंता भंग करणे, नागरीकांना मारहाण करुन गंभीर जखमी करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
नमदु गुन्हयामध्ये गजा मारणे टोळीतील कुख्यात पाहिजे आरोपी रुपेश कृष्णराव मारणे, वय ४१ वर्षे, रा. नवएकता कॉलनी, हमराज चौक, शास्त्रीनगर, कोथरुड, पुणे. हा गुन्हा घडलेपासुन सुमारे ०९ महिन्यापासुन फरार होता. त्याचेवर कोथरुड पोलीस स्टेशन व पुणे शहरामध्ये एकुण २० प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असुन त्याचा पुणे शहर व इतर भागात विविध स्तरावर शोध सुरु असता दि. २७/१०/२०२५ रोजी कोथरूड पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी व पोलीस अर्मलदार यांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मोक्का गुन्हयामध्ये गजा मारणे टोळीतील कुख्यात पाहिजे आरोपी रुपेश कृष्णराव मारणे हा मु.पो. आंदगाव, ता. मुळशी, जि.पुणे येथे आला आहे. सदरची बातमी मिळाल्याने लागलीच कोथरुड पोलीस स्टेशनकडील पोलीस अधिकारी व पोलीस अर्मलदार तात्काळ नमुद ठिकाणी जावुन आरोपीचा शोध घेतला असता आरोपी त्याचे घराचे बेडरुमध्ये लपला असताना त्यास ताब्यात घेतले. नमुद गुन्हयाचा तपास मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा ०१, पुणे शहर श्री विजय कुंभार, हे करीत असल्याने आरोपी रुपेश मारणे यांस पुढील कार्यवाहीकामी त्यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ३. पुणे शहर, श्री. संभाजी कदम, मा. सहायक पोलीस आयुक्त, कोथरूड विभाग, पुणे शहर, श्री. भाऊसाहेब पठारे यांचे मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोथरुड पोलीस स्टेशन, पुणे शहर, संदिप नारायण देशमाने, यांचे सुचनेप्रमाणे पोलीस अंमलदार अंबादास लोखंडे, संजय दहिभाते, अजय शिर्के व सोमनाथ हुलगे यांनी केली.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!