सायबर पोलीस ठाणेची उलेखनीय कामगिरी ! जेष्ठ नागरिकास ०१ कोटी ६० लाख रुपयांच्या फसवणुक करणाऱ्या ०६ आरोपींना ठोकल्या बेड्या…


पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626

सायबर पोलीस ठाणे, पुणे शहर

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- पुण्यातील जेष्ठ नागरिक यांना व्हॉट्सअॅप कॉलव्दारे शेअर मार्केट इन्व्हेसमेंटबाबत अनन्या गुप्ता महिलेने संपर्क करुन (G5) UP stox value-added technical information sharing. Rajat Parmar Growth Visionary Blinkx PEI, (132) Star Alliance या वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप ग्रुप मध्ये अॅड करुन वेळोवेळी मो. क्रमांक-+९१७७२५९९७६८१, रजत परमार व्हाट्सअॅप मोबाईल क्रमांक- +९१८७९१५९७६५६, +९६३३५४५६३९,+७९९५१४८२३२, +९१६३६६२०३५६२, हरी माथूर व्हाट्सअॅप मोबाईल क्रमांक-+९१९९८१३७४६४३ यावरुन संपर्क साधुन शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक करुन चांगला परतवाना मिळेल असे सांगुन अनेक बँक अकाउंटवर ०१ कोटी ६० लाख रुपये वेळोवेळी भरण्यास प्रवृत्त करुन आर्थिक फसवणुक केली म्हणुन सायबर पोलीस ठाणे, पुणे शहर येथे गुन्हा रजिस्टर नं ३९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४),३१९ (२),३१६ (५).३ (५) सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (डी) नुसार गुन्हा दाखल असुन त्याचा तपास सायबर पोलीस ठाणे, पुणे शहर येथुन चालु आहे.

दाखल गुन्ह्याचा तत्परतेने तपास करीत असताना आरोपी यांनी गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यांवर घेतली असल्याने तपास करताना पुण्यातील वाघोली येथील आयडीएफसी बँक खात्यात दि.१७/०३/२०२५ रोजी ०५,८२,०००/- रक्कम चेकव्दारे विथड्रॉल झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. तेव्हा क्षणाचा विलंब न करता सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ सदर बँक खात्याचे खातेधारक आरोपी केतन भिवरे रा. खराडी, पुणे यास ताब्यात घेतले. गुन्ह्यातील बँक खाते व मोबाईल क्रमांक यांचे तांत्रिक तपास केला असता, त्यात आरोपी आरोपी गोविंद सुर्यवंशी, रा वाघोली, पुणे मुळ रा हिंगोली व आरोपी रोहित कंबोज, रा वाघोली, पुणे मुळ रा. पंजाब, आरोपी ओमकार भवर, रा वाघोली, पुणे मुळ रा. हिंगोली, आरोपी जब्बरसिंह पुरोहित, रा चहोली, पुणे मुळ रा. धारावी, मुंबई यांचा सहभाग असल्याचे दिसल्याने त्यांना तात्काळ ताब्यात घेतले.

यातील आरोपी गोविंद सुर्यवंशी हा पुण्यातील वाघोली परिसरातील विघ्नेश्वर मल्टीस्टेट को. ऑप. बँकेचा संचालक असुन या बँकेच्या टेक्निकल कामात आरोपी रोहित कंबोज काम करत असल्याने त्याचा फायदा घेतला आहे. दोघे बी. टेक, उच्च शिक्षित असुन त्यांच्या डिगीव्हेंटरी वननेस, रजत सेल अशा डिजिटल मार्केटिंग नावाच्या कंपन्या आहेत. आरोपी गोविंद सुर्यवंशी व रोहित कंबोज हे दोघे क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारामध्ये सक्रिय असुन त्यांनी त्याव्दारे अनेक युएसडीटी आरोपी जब्बरसिंह पुरोहित, रा चहोली, पुणे मुळ रा. धारावी, मुंबई दिले असल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच गुन्ह्यातील बँक खाते बनवुन त्याचा पुरवठा करणारा आरोपी निखिल ऊर्फ किशोर सातव, राहणार वाघोली, पुणे यास देखील पोलीसांनी ताब्यात घेतलेले आहे.

वरिल सर्व ०६ आरोपी यांचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना दाखल गुन्ह्यात अटक करुन मा. न्यायालयात हजर केले असता त्यांची एकुण १२ दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजुर करण्यात आली आहे. आतापर्यत झालेल्या तपासात यातील आरोपींनी सायबर गुन्हा करताना सुमारे १०० ते १५० बँक खात्यांचा वापर केला असून नॅशनल सायबर पोर्टलवर त्यांच्या विरुध्द वेगवेगळ्या राज्यात एकुण २९ तक्रारी असल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्यामुळे पुणे सायबर पोलीसांना संपूर्ण भारतातील २९ तक्रारी / गुन्हे उघडकिस आणण्यात यश मिळालेले आहे. आरोपीचे दुबई, गुजरात, वेस्ट बंगाल या ठिकाणी कनेक्शन असल्याचे तपासात निष्पन्न असुन सायबर पोलीस ठाणे, पुणे शहर येथील पथक गुन्ह्याचा सखोल तपास करत आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री अमितेशकुमार सोो. पुणे शहर, मा. पोलीस सह आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा सोो, पुणे शहर, मा. अपर पोलीस आयुक्त श्री शैलेश बलकवडे सोो. (गुन्हे) पुणे शहर, मा. पोलीस उप-आयुक्त श्री विवेक मासाळ सोो., आर्थिक व सायबर पुणे शहर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री मच्छिंद्र खाडे, आर्थिक व सायबर पुणे यांचे मार्गदर्शनाखाली स्वप्नाली शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर, पोलीस उप-निरीक्षक संदिप कदम, पोउपनि तुषार भोसले, पोहवा चव्हाण, पोहवा ०९२१ मुंढे, पोहवा कोंडे, पोशि. ८४३९ संदिप पवार, पोशि.१०१०७ दिनेश मरकड, पोशि २६२७ यादव, पोशि १०७१६ नागटिळक, पोशि ९९०७ सचिन शिंदे, पोहवा जमदाडे, पोहवा सोनुने, सर्व नेमणुक सायबर पोलीस ठाणे, पुणे शहर आणि (विशेष सहाय्य पोउपनि मेमाणे, चतुःश्रृंगी पो.स्टे. पुणे शहर) यांनी सदरची कामगिरी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!