डंपरच्या चाकाखाली सापडून मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या अपघातप्रकरणी डंपर चालकासह मालकावर गुन्हा दाखल
रोहन कानकाटे पुणे जिल्हा प्रतिनिधी
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- वाघोली येथील बाईफ रोड परिसरात डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेमध्ये दुचाकीवरील महिला डंपरच्या चाकाखाली सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याप्रकरणी डंपरचालकासह मालकावर वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहिती नुसार, बाईफ रोड परिसरात आयडीबीआय बँकेजवळ डंपरने
दुचाकीला धडक दिल्यानंतर दुचाकीवरील रुपाली सुरज तिवारी (वय २७, रा. पार्थ व्हिलाज, बाईफ रोड) या डंपरच्या चाकाखाली सापडल्याने त्यांना फरफटत नेले होते. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर तिवारी यांचे पती देखील जखमी झाले होते.
यानंतर वाघोली पोलिसांनी डंपर चालक शुभम सुदाम मस्के (वय २५, रा. लोणीकंद) याच्यावर तसेच मस्के याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नसताना वाहन ताब्यात देऊन जड वाहनास प्रतिबंधित रोडवर वाहन चालविण्यास प्रोत्साहन केल्याने मस्के याने अपघात केल्याने डंपर मालक प्रमोद भाडळे (रा. वाघोली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सुरज शिवकुमार तिवारी यांनी फिर्याद दिली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव