सायबर फसवणूक करणाऱ्या स्वतःचे अकाउंट हॅक झाले म्हणून तक्रार देणाऱ्या, देशांमधील अनेक पोलीस स्टेशनला गुंगारा देणाऱ्या आरोपीला पिंपरी चिंचवड येथून केले जेरबंद


पंकेश जाधव संपादक 7020794626

चंदननगर पोलिस स्टेशन पुणे शहर

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- तक्रारदार यांना तसेच इतर अर्जदार यांना अनोळखी व्यक्तीने प्रथम व्हाट्सअप द्वारे व त्यानंतर टेलिग्रामद्वारे संपर्क साधून, टेलिग्राम आयडी जॉईन करण्यास सांगून वेगवेगळे टास्क पूर्ण करण्यास सांगून, वेगवेगळे बँक अकाउंट वर पैसे प्राप्त करून टास्क अकाउंट वर भरलेल्या पैशाबाबत काही एक प्रतिसाद व मोबदला न देता एकूण २४,९५,९९५/- रु.ची आर्थिक फसवणूक केले बाबत चंदन नगर पोलीस स्टेशन गु र. क्र २५०/२०२३ भादंवि कायदा कलम ४०९,४१९,४२०,३४ R/W ६६(C),६६(D) IT ACT-२०००] प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हाचे अनुषंगाने तक्रारदार यांची फसवणूक झालेल्या पैशाबाबत तसेच बँक खाते धारकाबाबत माहिती घेतली असता, सदरचा बैंक खातेदार थेरगाव पिंपरी चिंचवड तसेच बँक लिंक मोबाईलचे लोकेशन हे नाशिक येथील येत होते बेनिफिशरी अकाउंट होल्डर अभिषेक रानडे यांच्याकडे ऑगस्ट २०२३ मध्ये चौकशी केली असता त्यांनी त्याचे अकाउंट हॅक झाल्याबाबत वाकड पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली बाबत सांगितले तसेच त्यांनी ऑनलाईन तक्रार देखील दिले बाबत सांगितले सदर बाबत येस बँक मॅनेजर चिंचवड शाखा यांच्याकडे जाऊन विचारपूस करून सविस्तर माहिती घेतली. येस बैंक अकाउंट होल्डर अभिषेक रानडे चौकशीमध्ये वेगवेगळी कारण देत असल्याने त्याच्यावर संशय वाटल्याने त्याला अटक करून दि.०७.०२.२०२४ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी घेतली.

Advertisement

पोलीस कस्टडी मध्ये त्याने त्याचा नाशिक येथील मित्र याला ऑनलाईन फसवणुकीसाठी त्याचे नवीन करंट अकाउंट वापरण्यास देऊन बँकेला लिंक मोनं हा देखील नाशिक येथील मित्र याचा दिला ऑनलाईन फसवणुकीसाठी ०२ नवीन करंट अकाउंट येस बँक मध्ये ओपन केले. येस बँक खात्यामध्ये पार्ट टाइम जॉब च्या नावाने टास्क देऊन मोठ्या प्रमाणावर रक्कम प्राप्त केली. ऑनलाइन फसवणूक केल्यानंतर दि.२५.०३.२०२३ रोजी नाशिक येथील फसवणुकीमध्ये सहभागी असलेले त्याचे सहकारी यांच्याशी चर्चा करून वकिली सल्ल्याने अकाउंट हॅक झाले बाबत खोटी तक्रार दिली अटक आरोपी यांचे येस बँक खात्यावर १) भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड, २) सायबर क्राईम पोलीस स्टेशन मंडी हिमाचल प्रदेश, ३) सायबर क्राईम पोलीस स्टेशन त्रिपुर सिटी तामिळनाडू, ४) रोहतक पोलीस स्टेशन हरियाणा, ५) सायबर क्राईम सेन पोलीस स्टेशन बेंगलोर ६) पोलीस स्टेशन सरकंडा बिलासपूर छत्तीसगड, ७) सायबर क्राईम पोलीस स्टेशन कुंडुर तामिळनाडू असे गुन्हे नोंद असले बाबत समजून आले तसेच देशामधील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन येथून ८० नोटीस देखील बँकेमध्ये आले बाबत समजून आले.

सदर गुन्हयाचा पुढील तपास चंदननगर पोलिस स्टेशन सायबर पथकाचे पोलिस उप निरी. रामेश्वर रेवले हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. पोलिस उपायुक्त परिमंडळ ४ पुणे शहर श्री. विजयकुमार मगर, मा. सहाय्यक पोलिस आयुक्त येरवडा विभाग पुणे शहर श्री. संजय पाटील, मा. वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंदननगर पोलिस स्टेशन श्रीमती मनीषा पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पथकाचे पोलिस उप निरी रामेश्वर रेवले पोलिस अमंलदार, भरत उकिरडे, आत्तार, संतोष शिंदे, म.पो. अमंलदार डहाळे, वानखेडे, सारवाड यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!