मेडीकल दुकानदारास सशस्त्र दरोडा घालुन रोख रक्कम लुटणारे चोरटयांना अटक वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी.
पंकेश जाधव संपादक 7020794626
वाकड पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :– दि.०७/०२/२०२४ रोजी फिर्यादी नामे आशिष दिलीप शहा, वय ४४ वर्षे, रा. फिलीप्स सोसायटी, वानवडी, पुणे यांनी पोलीस स्टेशन मध्ये हजर होवुन सांगीतले की, त्यांचे कलाटे गार्डन वाकड पुणे येथील चंदन फार्मासिस्ट मेडीकलचे दुकान सायंकाळी ७.१५ वा सुमा. बंद करुन मेडीकल मधील दिवसभराची रोख रक्कम ४५,५६०/- घेवून मोटार सायकल जवळ जात असताना तेथे ०५ अनोळखी इसम आले त्यांचेतील एका इसमाकडे लोखंडी कोयता होता, त्यांनी माझे ताब्यातील रोख रक्कम असलेली बॅग जबरदस्तीने दरोडा टाकुन त्यांचे मोपेड वरुन पळुन गेले असे सांगीतले. सदरचा गुन्हा अंत्यत गंभीर स्वरुपाचा असल्याने त्यानंतर पोलीस उपआयुक्त परिमंडळ ०२ श्री. बापू बांगर, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री. संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त श्री. विशाल हिरे यांनी फिर्यादी यांची भेट घेवुन घटनेची माहीती घेतले नंतर गुन्हे युनिट, गुंडा स्कॉड, खंडणी दरोडा पथक व वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाच्या टिम तयार करुन त्यांना मार्गदर्शन व सुचना देवुन गुन्हा उघड करुन आरोपींना तात्काळ अटक करणेकामी आदेशीत केले.
मा.श्री. गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाकड पोलीस ठाणे यांनी घटनेची गांभीर्य ओळखुन तपास पथकास तात्काळ आरोपी निष्पन्न करुन त्यांना ताब्यात घेणेबाबत सुचना दिल्या व फिर्यादी नामे आशिष दिलीप शहा वय ४४ वर्षे रा. फिलीप्स सोसायटी, वानवडी, पुणे यांचे तक्रारीवरुन वाकड पोलीस स्टेशन गु.रजि.नं. १३८/२०२४ भादविक ३९५, आर्म अॅक्ट ४,२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला.
गुन्हा घडले ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता सर्व आरोपींनी गुन्हा करुन पळून जाताना तोंडाला मास्क लावलेने त्यांची ओळख पटविणे अवघड झाले. परंतु तपासामध्ये एक गोष्ट समोर आली की, सदरचे आरोपी हे त्याच परीसरात खुप वेळ फिरत होते. यावरुन सदरचे आरोपींना फिर्यादी हे पैसे घेवुन येणार याची आधीच माहीती होती याचा धागा पकडून तपास सुरु केला व आरोपींनी गुन्हा करणेकरीता येताना व गुन्हा करुन पळून जाताना ज्या रुटचा वापर केला होता. त्यांचा शोध घेवुन सर्व आरोपीची ओळख पटवीली. आरोपी हे भोसरी भागात नेहमी एकञ येत असलेची माहीती मिळाली तसेच त्यांचेतील ०३ आरोपी हे सराईत गुन्हेगार असलेची माहीती मिळाली. आरोपी हे राञीचे वेळी भोसरी भागात निर्जन स्थळी बसलेले आहेत अशी माहीती मिळालेने लागलीच तेथे जावुन छापा कारवाई करीत ०४ आरोपींना ताब्यात घेवुन त्यांचेकडे तपास केला असता त्यांनी स्वतःची नावे १) व्यंकटेश ऊर्फ हर्षल परशुराम जाधव वय २० वर्षे रा. तायरा कॉलनी, मेदनकरवाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे २) आदेश परशुराम शिंदे, वय २२ वर्षे, रा. काटे कॉलनी, च-होली फाटा, पुणे ३) गोविंद लालु रुपवते, वय १९ वर्षे, रा. सद्गुरु नगर, भोसरी, पुणे ४) एक विधीसंघर्षीत बालक असे सांगीतले. त्यांना गुन्हयाची माहीती विचारली असता त्यांनी गुन्हयाची कबुली देवुन सांगीतले की, आम्ही व आमचा गुन्हयातील साथीदार सोन्या ऊर्फ ऋषीकेश नाना धोत्रे वय २१ वर्षे रा. दुर्गामाता नगर, चिंचवड स्टेशन, चिंचवड पुणे असे आम्ही ०५ जणांनी मिळून सदरचा गुन्हा केला आहे. आमचेतील प्रतिक दौंडकर हा आशिष शहा यांचे मेडीकल मध्ये पुर्वी कामास होता त्यास माहीती होती की, मालक
केव्हा रोख रक्कम घेवुन जात असतात त्यांचा फायदा घेवुन आम्ही गुन्हा केला आहे असे सांगीतले. गुन्हयाचेकामी ०४ आरोपींना अटक केली असुन ०१ विधीसंघर्षीत बालकास ताब्यात घेतले आहे. दाखल
गुन्हयाचा पुढील तपास चालु असुन तो सपोनि. पवार वाकड पो.स्टे. हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे साो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. बापु बांगर सो, पोलीस उप आयुक्त, परि-२ पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त सो, वाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा.श्री. विठ्ठल साळुंखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), पोउपनि. सचिन चव्हाण, पोउपनि. अनिरुद् सावर्ड, श्रेणीपोउपनि. बिभीषण कन्हेरकर, श्रेणीपोउपनि बाबाजान इनामदार, सपोफौ. राजेंद्र काळे, पोहवा. संदीप गवारी, पोहवा. वंदु गिरे, पोहवा. स्वप्निल खेतले, पोहवा. अतिश जाधव, पोहवा. प्रमोद कदम, पोहवा. दिपक साबळे, पोहवा. अतिक शेख, पोना. प्रशांत गिलबीले, पोना. रामचंद्र तळपे, पोशि. भास्कर भारती, पोशि. अजय फल्ले, पोशि. स्वप्निल लोखंडे, पोशि रमेश खेडकर, पोशि. ज्ञानदेव झेंडे, पोशि. सागर पंडीत (परि-०२ कार्यालय) यांनी मिळून केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

