कोंढवा पोलीस स्टेशनची यशस्वी कामगिरी गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपींना पर जिल्ह्यातुन ठोकल्या बेड्या


पंकेश जाधव संपादक 7020794626

कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांक १४/०१/२०२४ रोजी रात्री २२/३० वाजताच्या सुमारास सार्वजनिक रोडवर समतानगर, कोंढवा खुर्द, पुणे येथे जुन्या भांडणाच्या कारणावरुन इसम नामे सनी चव्हाण व अनिश चव्हाण रा. समतानगर, कोंढवा रोड, पुणे हे फिर्यादी यांचा मित्र सैनुद्दीन शेख ऊर्फ कल्लू वय ३२ वर्षे याला मारण्यासाठी अंगावर घावुन जात असताना सदरची भांडणे सोडवण्यासाठी फिर्यादी यांनी मध्यस्ती केली असता फिर्यादी यांचे ओळखीचा इसम नामे शेहबाज शेख रा. कृष्णानगर, पुणे व इतर यांनी कल्लू याचे डोक्यात तसेच हातावर धारधार हत्याराने मारुन त्याला गंभिर जखमी केल्याने फिर्यादी व कासीम सय्यद कल्लू याला वाचविण्यासाठी मधे गेले असता त्यांना सनी चव्हाण, अनिश चव्हाण व इतर यांनी लाथा बुक्यांनी मारहाण केल्याने शेहबाज शेख व त्याचे इतर साथीदार यांचे विरुध्द ५४/२०२३ भादंवि कलम ३०७,३२६,३२४,१४३,१४४,१४७,१४८,१४९, ३२३.३४ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचे अनुषंगाने मा. वपोनि संतोष सोनवणे, पोनि गुन्हे मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे आरोपींचा शोध घेत होते. परंतु आरोपी हे त्यांचे राहते घरी अथवा नातेवाईकांकडे शोधुन मिळुन येत नव्हते. तेव्हा पासुन मुख्य आरोपी हे गुन्हा घडलेपासुन फरार होते. दि. ०९/०२/२०२४ रोजी पोहवा सतिश चव्हाण व पोहवा विशाल मेमाणे यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत माहीती प्राप्त

Advertisement

झाली की, यातील मुख्य आरोपी शेहबाज शेख हा त्याचे साथीदारांसह बेलापुर ता अकोले जिल्हा अहमदनगर येथील शेतातील झाडावर मचान बांधुन लपुन बसलेले असल्याची माहीती प्राप्त झाल्याने तपासी अधिकारी पोउपनिरी बालाजी डिगोळे यांना पोहवा सतिश चव्हाण, विशाल मेमाणे यांचेसह कोंढवा पोलीस स्टेशन येथुन तपासकामी बेलापुर ता अकोले जिल्हा अहमदनगर येथे मुख्य आरोपीचा शोध घेणेकामी रवाना झाले. सदर ठिकाणी आरोपी नामे १) शेहबाज मोद्दीन खान, वय ३० वर्षे रा. कृष्णानगर, मोहमंदवाडी, पुणे. २) बालाजी तिमन्ना मंगाली, वय ३५ वर्षे, रा. कामटेशाळेचे पाठीमागे, येवलेवाडी, पुणे. ३) सुरज राजेंद्र सरतापे, वय २५ वर्षे रा. चिमटावस्ती फातिमानगर पुणे. ४) जुबेर कटुस कुरेशी, वय ३५ वर्षे, रा. जमनशहा दर्गाजवळ, कासेवाडी भवानीपेठ पुणे हे मिळुन आल्याने त्यांना दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आले व त्यांचेकडे इतर आरोपी यांचेबाबत तपास करुन पाहिजे आरोपी नामे ५) रॉकी ईदी अॅन्थोनी, वय ३१ वर्षे, रा. वानवडी बाजार गिरमे शाळेच्या मागे, दुर्गामाता मंदिराशेजारी, पुणे यास दि. १३/०२/२०२४ रोजी त्याचे राहते घरातुन ताब्यात घेवुन त्यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. सदरचे आरोपी हे पुर्वीचे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

वरिल नमुद कारवाई मा. अमितेशकुमार, पोलीस आयुक्त, मा. प्रविण पवार, सह पोलीस आयुक्त, मा. मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, मा. आर राजा, पोलीस उप आयुक्त परि.०५, मा. शाहुराव साळवे सहा पोलीस आयुक्त वानवडी विभाग, श्री संतोष सोनवणे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस स्टेशन, श्री मानसिंग पाटील, मा. पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक दिनेशकुमार पाटील, सहा पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, तपासी अधिकारी बालाजी डिगोळे, पोलीस हवालदार सतिश चव्हाण, विशाल मेमाणे, लवेश शिंदे, पोलीस अंमलदार सुजित मदन, लक्ष्मण होळकर, शाहीद शेख, संतोष बनसुडे, सुरज शुक्ला यांच्या पथकाने केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!