मार्केट यार्ड पोलिसाची दमदार कामगिरी ! जबरी करणा-या गुन्हेगाराला अटक करुन त्याचेकडुन एकुण ९५,१००/- रु. किं.चा. मुद्देमाल केला जप्त


पंकेश जाधव संपादक 7020794626

मार्केटयार्ड पोलीस स्टेशन, पुणे शहर

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मार्केट यार्ड पोलीस ठाणे कडील रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे प्रकाश देवराम परिहार ऊर्फ पक्या, वय २५ वर्षे, रा. गल्ली नं. ०१, राम मंदीराजवळ, लोहीया नगर, पुणे याने आंबेडकरनगर परीसरात एका इसमास धारदार हत्यार दाखवुन मोबाईल व रोख रक्कम चोरी केली असुन मार्केटयार्ड पोलीस स्टेशन गु.र.नं. ३४/२०२४ भा.द.वि. कलम ३९४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

Advertisement

मार्केट यार्ड पो.स्टे च्या हद्दीत वरिष्ठांच्या आदेशान्वये मार्केटयार्ड पोलीस ठाणेचे कार्यक्षेत्रातील शिवजयंती निम्मीत्त मिरवणुक असल्याने रेकॉर्डवरील आरोपी, पाहिजे आरोपी, चेक करणेकामी तपास पथकातील सपोनि मदन कांबळे, व स्टाप यांचेसह मार्केटयार्ड रिक्षा स्टॅन्ड येथे पेट्रोलीग करीत असताना, पोलीस अंमलदार गायकवाड यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, प्रकाश देवराम परिहार ऊर्फ पक्या, हा शारदा गजानन मंदिरा शेजारील पान टपरी शेजारी उभा आहे. सदर बातमीची खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिल्याने शारदा गजानन मंदिरा शेजारी आडबाजुस उभे राहुन पाहणी केली असता, बातमी प्रमाणे प्रकाश देवराम परिहार ऊर्फ पक्या हा पान टपरी समोर उभा असल्याचे दिसल्याने तो आम्हास पाहून पळून जात असताना त्यास पकडून त्यास त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव प्रकाश देवराम परिहार ऊर्फ पक्या, वय २५ वर्षे, रा. गल्ली नं. ०१, राम मंदीराजवळ, लोहीया नगर, पुणे असे असल्याचे सांगितले असुन त्याचे कडे दाखल गुन्हयाबाबत तपास करता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यास दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. दाखल गुन्हयातील आरोपीची पोलीस कस्टडी घेवुन त्यास अधिक विश्वासात घेता आरोपी प्रकाश देवराम परिहार ऊर्फ पक्या, याने ८५,०००/- रु कि ०६ मोबाईल, १०,०००/- रु कि, ०१ अॅक्टीव्हा मोपेड व १००/- रु किं चा धारदार हत्यार असा एकुण ९५,१००/- रु किं चा माल पंचासमक्ष जप्त करण्यात आलेला आहे. अॅक्टीव्हा चोरी बाबत मार्केट यार्ड पो.स्टे. गु.र.नं. २६७/२०२३ भा. द. वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असुन दोन गुन्हे उघड करण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, पुणे शहर, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५ पुणे शहर श्री. आर. राजा, मा. सहा पोलीस आयुक्त वानवडी विभाग, श्री गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली मार्केट यार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्वप्नाली शिंदे यांचे आदेशाने तपास पथकाचे सपोनि मदन कांबळे, पोलीस अंमलदार थोरात, जाधव, गायकवाड, यादव, झायटे यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!