पेट्रोलिंग दरम्यान चेन स्नॅचिंग करणाऱ्या इसमास Unit-2 ने पाठलाग करून पकडले.


पंकेश जाधव संपादक 7020794626

गुन्हे शाखा युनिट २ पुणे शहर 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- आज दि. 18/03/24 रोजी दुपारी 13.00 वा. सुमारास Unit-2 कडील स्टाफ स्वारगेट ST स्टँड, PMT स्टॉप या गर्दीचे ठिकाणी पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान फिर्यादी महिला नामे मंजुळा नारायण चिल्लाळ वय 59 रा. गुजरवाडी कात्रज पुणे ह्या स्वारगेट पोलीस स्टेशन समोरून घोरपडे पेठ कडे पायी चालत जात असताना पाठीमागून चालत आलेल्या एका इसमाने त्यांचे गळ्यातील अंदाजे 11 ग्रॅम वजनाचे 66,000 ₹ किमतीचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसका मारून पळून जात असताना गस्तीवरील HC मोहसीन शेख व HC संजय जाधव यांनी त्यास पाठलाग करून थोड्याच अंतरावर दुपारी 13.20 वा. सुमारास पकडले. त्यास PSI पाटोळे यांनी संपूर्ण नाव पत्ता विचारता, त्याने त्याचे नाव बाळू प्रकाश रणपिसे वय-32 व्यवसाय- शिक्षक रा. मु.पो.बोरगाव, डॉ. आंबेडकर नगर, बौद्ध विहार जवळ, ता. माळशिरस जि. सोलापूर असे असल्याचे सांगितले. त्याची पंच व फिर्यादी समक्ष अंगझडती घेता, त्याचे ट्रॅक पँटचे खिशात 1 तुटलेला सोन्याचा मंगळसूत्र मिळून आला तो फिर्यादी यांनी ओळखून त्यांचाच असल्याचे समक्ष सांगितल्याने तो पंचनाम्याने जप्त करण्यात आला आहे.

Advertisement

सदरबाबत फिर्यादी यांनी खडक पो स्टे CR No 80/2024 IPC 392 प्रमाणे फिर्याद दिल्याने आरोपी बाळू प्रकाश रणपिसे वय-32 रा. मु.पो.बोरगाव, डॉ. आंबेडकर नगर, बौद्ध विहार जवळ, ता. माळशिरस जि. सोलापूर यास वैद्यकीय तपासणी करून त्यास पुढील कार्यवाही करीता मुद्देमालासह खडक पो स्टे च्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री अमितेशकुमार, मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री शैलेश बलकवडे मा.पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री.अमोल झेंडे, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-1 श्री.सुनील तांबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नंदकुमार बिडवई, यांचे मार्गदर्शनाखाली PSI राजेंद्र पाटोळे, पो.अंमलदार शंकर नेवसे, संजय जाधव, विनोद चव्हाण, नागनाथ राख व मोहसीन शेख या पथकाने केलेली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!