भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्युपर्ण कामगिरी ! चारीत्र्याच्या संशयावरुन पत्नीचा चाकुने निघून खुन करणाऱ्या आरोपी अदक


पंकेश जाधव संपादक 7020794626

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर

महा पोलिस न्यूज़ ! ऑनलाइन पुणे :- दिनांक १५/०६/२०२४ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार विक्रम सावंतं, धनाजी धोत्रे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कात्रज कोंढवा रोडवरील जानु याईन्स, समोरील पटांगणात एक इसम दारु पित असुन तो इसम दारु पिताना त्याचे पत्नीचा खुन करुन टाकले असल्याचे सांगितले. लागलीच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील अधिकारी व अंमलदार यांनी कात्रज कोंढवा रोडवरील जानु वाईन्स, समोरील पटांगणात जावुन इसम नामे कृष्णा अंबादास कदम, वय २५ वर्षे, रा. सध्या नंबर ८, गल्ली नंबर ०३, तळजाई पटार, पुणे यास ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास करता त्याने दिनांक १५/०६/२०२४ रोजी बालाजीनगर, अश्वीनी लॉज येथे रुम नंबर ४०५ मध्ये त्याची पत्नी काजल कृष्णा कदम हिचा चाकुचे सहाय्याने खुन केला असल्याचे सांगितले. त्यावरुन बालाजीनगर, अश्वीनी लॉज येथे रुम नंबर ४०५ मध्ये जावुन पाहता तेथे महीला काजल कृष्णा कदम, ही बेडवर ही मृत अवस्थेत मिळुन आली आहे. सदर महीलेचा खुन केला म्हणुन महीला नामे श्रीमती संगीता आकाश सकट, वय ५ वर्षे, रा.संन ८, गल्ली नंबर ३, तळजाई पठार, पुणे यांनी दिले तक्रारीवरुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ४९९/२०२४, भादंवि कलम ३०२, अन्वये गुन्हा दाखल केला असुन त्यामध्ये आरोपी कृष्णा अंबादास कदम, वय २५ वर्षे, रा. सध्या नंबर ८, गल्ली नंबर ०३, तळजाई पटार, पुणे यास नमुद गुन्हयामध्ये अटक केली आहे.

Advertisement

सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर, मा. प्रविण पवार साो, सह आयुक्त, पुणे शहर, मा. प्रविणकुमार पाटील साो, अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. श्रीमती स्मार्तना पाटील साो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. नंदीनी वग्याणी साो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री डी.एस.पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार विक्रम सावंत, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, अभिनय चौधरी, अवथतु जमदाडे, सचिन सरपाले, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, शैलेश साठे, नामदेव रेणुसे, चेतन गोरे, महेश बारवकर, निलेश जमदाडे, निलेश ढमढेरे, हनमंत मासाळ, विक्रम सावंत, राहुल तांबे, यांच्या पथकाने केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!