नागरीकांचे हरवलेले १५ मोबाईल पर्वती पोलीसांकडून परत


पंकेश जाधव संपादक 7020794626

पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर.

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे:- पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत मागील ०६ महिन्यात नागरीकांचे बाजारपेठ तसेच इतरत्र मोबाईल हरवल्याच्या तक्रारी आल्या होत्या. सदर मोबाईलचा शोध घेण्याबाबत आम्हांला मा. वरीष्ठांचे आदेश प्राप्त झाले होते. त्या अनुषंगाने एक पथक नेमले.

सदर पथकात पोलीस अंमलदार धायगुडे व खेडकर अशी नेमणूक करण्यात आली. सदर पथकान हरविलेल्या मोबाईल तसेच नंतर त्यामध्ये वापरत असलेल्या नंबरचे तात्रिंक विश्लेषण करुन तसेच प्रत्यक्ष संपर्क साधून कर्नाटक, राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात व महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळया जिल्हयातून एकुण १५ मोबाईल हस्तगत केले आहेत. तसेच सदर मोबाईल दि.०५/११/२०२४ रोजी मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-३, पुणे शहर श्री. संभाजी कदम यांच्या हस्ते नागरिकांना परत करण्यात आले आहेत. याबाबत नागरिकांनी पर्वती तसेच पुणे शहर पोलीस दलाचे आभार व्यक्त केले.

Advertisement

सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, श्री. प्रविण पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ३ पुणे श्री. संभाजी कदम, मा. सहा. पोलीस आयुक्त सिंहगड विभाग, पुणे श्री. अजय परमार, वरीष्ठ पोलीस निरीक्षक पर्वती पोलीस स्टेशन, पुणे श्री. नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. अमोल मोरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार धायगुडे व खेडकर यांनी केली आहे.


Maha police NEWS

Cheif Editor : Pankesh jadhav

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!