किंमती मुद्देमाल फिर्यादी यांना परत केलेबद्दलचा वितरण समारंभ पार पाडले…


पंकेश जाधव संपादक 7020794626

पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक ०२/०१/२०२५ रोजी महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून दिनांक ०२/०१/२०२५ ते दिनांक ०८/०१/२०२५ या सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन हा दिवस मोठ्या उत्साहाने महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन म्हणून साजरा करण्यासाठी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी आदेशित केले होते.

त्यानुसार दिनांक ०६/०१/२०२५ रोजी ४:३० ते ६:०० या कालावधीमध्ये महात्मा फुले सांस्कृतिक भवन, शिवरकर रोड, वानवडी, पुणे येथे पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५. पुणे शहर यांनी किंमती मुद्देमाल वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

Advertisement

सदर समारंभास मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे श्री. प्रविणकुमार पाटील, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. शैलेश बलकवडे, मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील, व मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्री. निखील पिंगळे, इ. मान्यवर उपस्थित होते.

सदर समारंभामध्ये परिमंडळ ५ कार्यक्षेत्रामधील एकूण ९ पोलीस ठाणे यांच्याकडे वेगवेगळ्या कलमांना अनुसरुन दाखल असलेल्या गुन्ह्यांमधील ९४ फिर्यादी यांचा रु. १,८०,५७,३२९/- (अक्षरी रुपये एक कोटी ऐंशी लाख सतावन्न हजार तिनशे एकोणतीस फक्त) इतक्या किंमतीचा (त्यामध्ये दुचाकी, तिनचाकी, चारचाकी वाहने, मोबाईल फोन, सोन्या चांदीचे दागिणे व रोख रक्कम) जमा असलेला व मा. न्यायालयाने आदेशित केलेला तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता सन २०२३ चे कलम १०६ मधील तरतुदीनुसार देय असलेला किंमती मुद्देमाल संबंधित फिर्यादी यांना प्रमुख अतिथी श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, श्री. शैलेश बलकवडे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग व श्री. निखील पिंगळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे इ. मान्यवर यांच्या हस्ते परत करण्यात आला.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!