कोथरुड भागातील खुनाच्या गुन्हयातील सराईताच्या मुसक्या आवळल्या गुन्हे शाखा युनीट ३ ची कामगिरी


पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626

युनिट ३ गुन्हे शाखा पुणे शहर

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक २५/०२/२०२५ रोजी युनीट ३, गुन्हे शाखा पुणे शहर येथील अंमलदार वारजे माळवाडी पोलीस ठाणे हदीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक वारजे माळवाडी पोलीस ठाणे श्री. विश्वजीत काईगडे व पोलीस निरीक्षक युनीट ३ गुन्हे शाखा पुणे शहर श्री. रंगराव पवार यांचे मार्गदर्शनाखाली पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार प्रतीक मोरे यांना त्यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दिनांक २४/०२/२०२५ रोजी कोथरुड पोलीस ठाणे गु.र.नं.५२/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१),१०३, (२),१८९(२),१८९(४), १९० सह आर्म अॅक्ट ३ (२५), ४ (२५) नुसार दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे बंड्या नागटिळक हा कर्वेनगर येथील डिपी रोडवर थांबलेला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी वरिष्ठांना कळवुन युनीट ३ कडील अंमलदार यांनी पाहिजे आरोपी नामे बंड्या ऊर्फ सिध्दार्थ अनिल नागटिळक वय.२२ वर्षे रा. कैलास मित्र मंडळजवळ साईनाथ वसाहत शास्त्रीनगर कोथरुड पुणे यांस वेदांत नगरी डी.पी रोड कर्वेनगर पुणे येथुन ताब्यात घेवुन त्याचेकडे चौकशी करता त्याचा खुनाच्या गुन्हयामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झालेने त्यास पुढील तपासकामी कोथरुड पोलीस ठाणे यांचे ताब्यात देणेत आलेले आहे.

नमुद आरोपी इसम बंडया ऊर्फ सिध्दार्थ अनिल नागटिळक वय.२२ वर्षे रा. कैलास मित्र मंडळजवळ साईनाथ वसाहत शास्त्रीनगर कोथरुड पुणे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर कोथरुड व हिंजवडी पोलीस ठाणे येथे चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई ही मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर, श्री. शैलेश बलकवडे मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा पुणे शहर श्री. निखिल पिंगळे, मा. पोलीस उप-आयुक्त, परि.३. श्री. संभाजी कदम, मा. सहा. पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग पुणे शहर, श्री. भाऊसाहेब पठारे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पुणे शहर श्री. गणेश इंगळे, यांचे सुचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक वारजे माळवाडी पोलीस ठाणे श्री. विश्वजीत काईंगडे व पोलीस निरीक्षक युनीट ३ गुन्हे शाखा श्री. रंगराव पवार यांचे मार्गदर्शनाखाली युनीट ३ गुन्हे शाखा कडील पोलीस अंमलदार विनोद भंडलकर, विनोद जाधव, गणेश सुतार, हरिष गायकवाड, प्रतिक मोरे, इसाक पठाण यांनी केलेली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!