सहकारनगर पोलिसस्टेशन तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी!दुचाकी चोराला अटक करून तीन दुचाकी केल्या जप्त…
पंकेश जाधव संपादक 7020794626
सहकारनगर पोलिस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त करुन तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. ही कारवाई सोमवारी (दि.25) करण्यात आली. सचिन शाम ढवळे (वय-43 रा. शंकर महाराज वसाहत, साई मंदिरामागे, धनकवडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
ख्रिसमस नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर सहकारनगर पोलीस ठाण्यातील तपास पथक हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी आरोपी सचिन ढवळे अॅक्टीव्हा मोपेड दुचाकीवरुन ट्रेझर पार्क कडून तावरे कॉलनीकडे वेगाने जाताना दिसला. पथकाला त्याचा संशय आल्याने पोलीस हवालदार भुजंग इंगळे व सुशांत फरांदे यांनी त्याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने डुप्लीकेट चावीच्या सहाय्याने आणखी दोन दुचाकी चोरल्याची माहिती दिली. पोलिसांनी 45 हजार रुपये किमतीच्या दोन अक्टिव्हा मोपेड व एक होंडा शाईन जप्त करुन तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत.
ही कामगीरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील , सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे , पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे , सहायक पोलीस उपनिरीक्षक बापु खुटवड, पोलीस अंमलदार भुजंग इंगळे, सुशांत फरांदे, बजरंग पवार, अमोल पवार, नलेश शिवतरे, महेश मंडलिक, नवनाथ शिंदे, सागर सुतकर, सागर कुंभार, विशाल वाघ यांच्या पथकाने केली.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

