जबरी चोरी करुन कोयते बाळगणाऱ्या आरोपींना शिवाजीनगर पोलीसांकडुन अटक
पंकेश जाधव संपादक 7020794626
शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि. 14/02/2024 रोजी पहाटे 04.15 वा. च्या सुमारास एक इसम पायी जात असताना दोन मोटर सायकल वर चार मुलांनी येवुन तक्रारदार यांचा मोबाईल फोन हिसकावुन जबरीने चोरी नेला होता. सदर बाबत शिवाजीनगर पोलीस स्टेशन गु.नं. 44/2024 भा.द.वि.क. 392,34 सह भारतीय हत्यार कायद कलम 4,25 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1),135 अन्वये दाखल आहे.
सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक सीसीटिव्ही फुटेज तपासुन आरोपीने गुन्हा करताना वापरलेली एक मोटर सायकल तिच्या वरील खुणे मुळे निश्चित केली. तसेच पोशि प्रविण धडस, पोशि सुदाम तायडे व पोहवा रुपेश वाघमारे यांना गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या खबरीच्या अनुषंगाने पोउपनि अजित बडे व टिम पुणे मनपा येथील ब्रिजखाली सापळा लावुन थांबले असता गुन्हा केलेले संशयीत आरोपी सीसीटिव्ही फुटेज मधिल गोटर सायकल सह तेथे आले. तसेच बातमीदाराने दिलेली माहीती प्रमाणेच सदरचे संशयीत आरोपी असल्याने त्यांना ताब्यात घेतले. सदर गुन्ह्यातील आरोपी 1) चंदु नंदु सरोदे वय 19 वर्षे रा.राज चौक, भिम ज्योत मित्र मंडळ, लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे 2) सिध्देश विश्वास शेंडगे वय 18 वर्षे रा.सेवक चौक, भिम ज्योत मित्र मंडळ, लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे (अटक) व त्यांच्या सोबतच्या दोन विधी संघर्षे बालके (ताब्यात) यांच्या कडुन गुन्ह्यात जबरी चोरी केलेला मोबाईल, दोन कोयते, दोन मोटर सायकल असा एकुन 1,00,250/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, मा.सह पोलीस आयुक्त प्रविण पवार, मा.अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त संदिप गिल, मा. सहा. पोलीस आयुक्त वसंत कुवर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पो. निरीक्षक चंद्रशेखर सावंत, सपोनि बाजीराव नाईक, पोउपनि अजित बडे, सपोउपनि अविनाश भिवरे, पोहवा राजकिरण पवार, पोहवा रुपेश वाघमारे, पोशि सुदाम तायडे, पोशि प्रविण धडस, पोशि आदेश चलवादी, मपोशि स्वालेहा शेख यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

