बलात्काराच्या आरोपाखाली दाखल गुन्ह्यात सचिन पांडे याचा जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन मंजूर.
पंकेश जाधव संपादक 7020794626
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- कोंढवा परिसरातील खळबळजनक घटना , आरोपी सचिन पांडे याचे निर्भया यांच्या घराच्या अवतीभोवती दररोज येणे जाणे असायचे , त्यामुळे दोघांमध्ये ओळख निर्माण झाली व मैत्री झाली . दूरध्वनी द्वारे संभाषण सुरू झाले , १० जुलै २०२३ रोजी घरात कोणीही नसताना आरोपी याने निर्भयाच्या घरात जाऊन , निर्भया नको म्हणत असताना जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. नंतर काही दिवसांनी निर्भया हीचे पोट दुखत असल्या कारणाने ती ससून हॉस्पिटल येथे उपचार कामी गेली असता , डॉक्टरांनी तपासून निर्भया ही गरोदर असल्याचे कळविले. त्याकारणाने कोंढवा पोलीस स्टेशन येथे बलात्कार ३७६ व बाललैंगिक अत्याचार ( पोक्सो ) , पोकसो कलम ४,६,८,१२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सदर आरोपी यास पोलीसांनी शोध घेऊन त्यास पोलीस कस्टडी, व नंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली ,
सदरबाब लक्षात घेता , आरोपी तर्फे वकील ॲड शैलेश बेरे-पाटील यांनी आरोपीच्या बाजूने युक्तीवाद केला. यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायालय पुणे यांनी आरोपी सचिन पांडे याचा आजरोजी जामीन मंजूर केला.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

