सिंहगडरोड शो-हे बु. येथे कोयते घेवून दहशत माजवित तीन युवकांवर प्राणघातक हल्ला करुन गंभीर दुखापती करणा-या टोळीला हवेली पोलीसांनी २४ तासात केले जेरबंद
पंकेश जाधव संपादक 7020794626
हवेली पोलिस स्टेशन पुणे ग्रामीण
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- हवेली पोलीस ठाणे हद्दीमधील गो-हे बु. येथे दि.०६/०३/२०२४ रोजी रस्त्यावरुन जाताना झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन १० ते १५ जणांनी सिंहगड रोडवर तीन युवकांना (फिर्यादी नचिकेत संजय जगताप व साक्षीदार १) निलेश श्रीराम शहा २) ऋषिकेश दिलीप जगताप सर्व रा. गोन्हे बुद्रुक, ता. हवेली, जि.पुणे) आडवुन कोयते व दगडाने प्राणघातक हल्ला करुन गंभीर दुखापत केलेबाबत हवेली पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. ५४/२०२४ भा.दं. वि. कलम ३२६, ३२३, १४३, १४७, १४८, १४९, भा.ह.का. कलम ४.२७ सह क्रिमि.अ. कलम ३. ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर घटनचे गांभीर्य ओळखून हवेली पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. सचिन वांगडे यांनी तात्काळ जखमींकडे द घटनास्थळावरील माहिती घेवुन आरोपींचा शोध घेणेकरिता हवेली पोलीस ठाणेचे अधिकारी व अमंलदार यांची वेगगवेगळे तपासपथक तयार करुन केले होते. सदर तपासपथकाने गुन्हा घडलेपासुन घटनास्थळ परिसरातील ठिकठिकाणच्या सीसीटीव्हीची पडताळणी करुन तसेच जखमी व साक्षीदार यांचेकडे माहिती घेतली असता आरोपी न-हे व धायरी परिसरातील असल्याची माहिती मिळाली होती.
दरम्यान चालक पोशि चौधरी, पोना/धनवे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारांकडुन आरोपींची माहिती प्राप्त झालेली होती. सदर माहितीचे आधारे सपोनि सागर पवार, पोहवा तोडकर, पोना/गायकवाड, पोना/धनवे, पोशि/चीधरी, पोशि/काळे, पोशि/शिंदे यांनी धायरी व न-हे परिसरात आरोपींचा शोध घेवुन आरोपींना शिताफीने २४ तासात ताब्यात घेतले आहे. आरोपीकडे प्राथमिक चौकशी केली असता त्यानी गुन्हयाची कबुली दिलेली असुन आरोपींना हवेली पोलीस ठाणे येथे हवेली पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. ६४/२०२४ गुन्ह्याचे तपासकामी अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्यामध्ये ६ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. फरार असलेले इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथके रवाना करण्यात आलेली आहेत. गुन्ह्यामध्ये २ विधीसंघर्षित बालकांचा देखील सहभाग आहे.
आरोपींची माहिती
१) गणेश राजु खुड़े वय २४ वर्षे रा.लोणारी चाळ, गोल्डन बेकरी मागे, धायरी फाटा, ता. हवेली जि.पुणे मुळ रा. बांडेवाडी खेड शिवापुर
२) सोमनाथ गुलाब पवार वय १९ वर्षे रा. पोकळेची चाळ, मारुती मंदीर मागे, धायरी गाव ता हवेली जि.पुणे मुळ रा. अर्धापुल, ता. जि. नांदेड
३) यश चंद्रकांत जावळकर, वय १९ वर्ष, रा. खालची आळी, खानापुर, ता.हवेली, जि. पुणे
४) अनिरुध्द अमित ठाकुर, वय १९ वर्षे, रा. प्लॅट नं. २०४ पोकळे पाटील बिल्डींग, खडकचौक, धायरी ता. हवेली, जि.पुणे
५) ओंकार संतोष पोळेकर वय १९ वर्षे रा. भैरवनाथ मंदीराच्या समोर उर्जा लेन ईरा बिल्डीग फ्लॅट नं ३०१ ता. हवेली जि.पुणे
६) हमजा कमरअली शेख वय २२ वर्षे, रा. रुम नं.२०५, जिजाऊ संकुल, भैरवनाथ मंदीर, धायरी गाव ता. हवेली जि.पुणे
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक साो, श्री. पंकज देशमुख साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक सो, श्री. रमेश चोपडे साहेब, यांनी दिलेल्या सूचना व आदेशाप्रमाणे मा. पोलीस उपअधिक्षक सो, श्री. भाऊसाहेब ढोले पाटील साहेब, हवेली विभाग व पोलीस निरीक्षक श्री. सचिन वांगडे, हवेली पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवेली पोलीस ठाणेचे सपोनि/सागर पवार, पोहवा तोडकर, पोना/गायकवाड, पोना/धनवे, पोशि/चौधरी, पोशि/काळे, पोशि/शिंदे यांचेसह इतर अधिकारी व अंमलदार यांनी मदत केलेली असुन अधिक तपास सपोनि सागर पवार हे करीत आहेत.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

