बिबवेवाडी पोलीस स्टेशन कडील रेकॉर्ड वरील तडीपार आरोपी लोखंडी तलवार सह केले जेरबंद…


संपादक :- पंकेश जाधव 7020794626

कोंढवा पोलिस स्टेशन पुणे शहर

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- कोंढवा पोलीस स्टेशन गु र न 265/2024 भा द वि 324,504,34 मधील आरोपींचा शोध घेणे कामी  वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी श्री लेखाजी शिंदे तपास पथक यांना मौखिक आदेश केले होते सदर आदेशानुसार आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अम शशांक खाडे व पोलीस अम अभिजीत जाधव यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की

साईनगर बालाजी किराणा दुकानाच्या समोर, कोंढवा खुाा पुणे येथे आरोपी नामे कैलास बाबुराव गायकवाड, हा थांबला आहे सदर आरोपीस ताबडतोब ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपी हा बिबवेवाडी पोलीस स्टेशन कडील रेकॉर्ड वरील आरोपी असून तो सध्या तडीपार असताना सुद्धा कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मिळून आला त्याच्याकडे जास्त चौकशी केलेअसता त्याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे त्यांनी कबूल केले तसेच गुन्ह्यासाठी वापरलेले एक हत्यार त्याच्याकडे मिळून आले म्हणून सदर आरोपी यास मा.पोलीस उप आयुक्त, परिमंडळ.05, पुणे शहर यांनी त्याचेकडील तडीपार आदेश क्र.53/2023, दिनांक.08/08/2023, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 1951 चे कलम.56(1)(अ)9(ब)अन्वये पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हा हद्दीतुन दोन वर्षाकरीता तडीपार केले केले असताना सदर आदेशाचा भंग करुन तसेच मा.सह पोलीस आयुक्त साो.,पुणे शहर याचे मान्यतेने मा.पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, पुणे शहर यांनी जा.क्र.पोउपआ/विशा/पुणे शहर/3169/2024, पोलीस उप आयुक्त विशेष शाखा, पुणे शहर दि.02/03/2024 रोजीच्या आदेशान्वये दि.05/03/2024 रोजी 00.01 वा पासुन दि.18/03/2024 रोजी 24.00 वा पर्यत काढलेल्या मनाई आदेशाचा भंग करून विनापरवाना लोखंडी लहान आकाराची तलवार जवळ बाळगला असताना मिळून आल्याने त्याचे विरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम.142,37(1)सह 135 व भारतीय हत्यार कायदा 4(25) प्रमाणे कायदेशीर फिर्याद देण्यात आली आहे.

Advertisement

सदर कामगिरी मा. अमीतेश कुमार पोलिस आयुक्त, मा.मनोज पाटील अप्पर पोलिस आयुक्त,पूर्व प्रादेशिक विभाग, मा.ए राजा पोलिस उप आयुक्त,परिमंडळ 5, मा. गणेश इंगळे मा.सहा पोलिस आयुक्त वानवडी विभाग पुणे, मा. संतोष सोनवणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोंढवा पोलिस स्टेशन, ,मा. मनसिंघ पाटील साहेब पोलिस निरीक्षक गुन्हे कोंढवा यांचे मार्गदर्शना खाली श्री लेखाजी शिंदे सहा पो निरी, श्री दिनेश पाटील सहा पो निरी, पो हवा अमोल हिरवे, पोलिस हवा राहुल वंजारी,पो अम अभिजित रत्नपारखी, पो अम रोहित पाटील, पो अम सुहास मोरे, पो अम थोरात,पो अम अक्षय शेडगे, पो अम गरुड,पो अम भोसले,पो अम विकास मरगळे,पो अम राहुल रासगे, पो अम शशांक खाडे कोंढवा पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!