रत्नागिरी विशेष कारागृहाचे कार्यालय व आतील सर्व बंदी बरॅक यांचे मजबुतीकरण व नुतनीकरण
पंकेश जाधव संपादक 7020794626
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- आज दिनांक १४.०३.२०२४ रोजी रत्नागिरी विशेष कारागृहाचे कार्यालय व आतील सर्व बंदी बरॅक यांचे मजबुतीकरण व नुतनीकरण तसेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे स्मारकाचे सुशोभिकरण इत्यादी कामाकरीता रुपये ८,२४,८४,४०६.०० (अक्षरी आठ कोटी चोविस लाख चौ-याएंशी हजार चारशे सहा फक्त) प्रशासकीय मान्यता मिळाली असुन सदर कामाचे भुमिपुजन सोहळा मा.श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते संपन्न झाला. तसेच या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती मा. श्री उदय सामंत, उदयोग मंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी व रायगड जिल्हा, मा.श्री रविंद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच प्रमुख उपस्थिती मा.श्री सुनिल तटकरे, लोकसभा सदस्य मा.श्री योगेश कदम, विधानसभा सदस्य मा.श्री किरण सामंत, उदयोगपती रत्नागिरी. मा.श्री अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पुणे.मा.श्री एम. देवेंदर सिंह, जिल्हाधिकारी रत्नागिरी मा.श्री योगेश देसाई, कारागृह उपमहानिरीक्षक, दक्षिण विभाग, भायखळा, मुंबई-८ या मान्यवरांच्या उपस्थीतीत संपन्न झाला. तसेच भुमिपुजन कार्यक्रम सपन्न झाल्यानंतर मा. गृहमंत्री यांनी व इतर मान्यवरांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे स्मारकास भेट देवुन स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन केले. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हस्ताक्षर व त्यांच्या जतन केलेल्या वस्तुंची पाहणी करुन समाधान व्यक्त केले. तसेच मा. श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री यांना मा.श्री उदय सामंत, उदयोग मंत्री यांनी कारागृह अधिकारी व कर्मचारी निवास्थान सन १८३४ साली बांधण्यात आली आहेत. सदर इमारतीला १९० वर्ष झालेली आहेत. सदरचे निवास्थान जीर्ण नादुरुस्त अवस्थेत असुन मोडकळीस आलेले आहे. सदर निवास्थान निष्कासीत करुन नवीन निवास्थान बांधण्याकरीता रु.८ कोटी इतका निधी मंजुर करणेबाबत विनंती केली असता मा. उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ प्रस्ताव सादर करण्यास आदेशीत केले. सदर उद्घाटन सोहळयाचा कार्यक्रम कारागृहाचे श्री अंकुश सदाफुले, अधीक्षक श्री रामराजे चांदणे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी श्रेणी-१ व सर्व अधिकारी कर्मचारी यांनी आयोजित करुन उत्कृष्ठरित्या उद्घाटन सोहळा संपन्न केला.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

