रेल्वे इंजिनला अडकला मृतदेह; उरुळी कांचन रेल्वे स्थानकातील घटना..


पत्रकार :- विशाल धाकतोडे पुणे ग्रामीण 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- पार्सल वाहतूक करणाऱ्या रेल्वेच्या इंजिनला एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह अडकून आल्याची धक्कादायक घटना उरुळी कांचन (ता. हवेली) रेल्वे स्थानकात उघडकीस आली आहे. शुक्रवारी (ता. १५) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार समोर आला.

Advertisement

पार्सल वाहतूक करणारी रेल्वे ही दौंडच्या बाजूकडून पुणेच्या बाजूकडे निघाली होती. उरुळी कांचन या ठिकाणी आली असता सदर व्यक्तीचा मृतदेह हा रेल्वेच्या इंजिनला अडकलेल्या अवस्थेत आढळून आला.

दरम्यान, व्यक्तीचा मृतदेह कुठून व कसा रेल्वेच्या इंजिनला अडकला याची माहिती अद्याप मिळू शकली नसून उरुळी कांचन रेल्वे पोलीस, रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुढील कार्यवाही सुरु आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!