गुन्हे शाखा युनिट 3 दमदार कामगिरी !सराईत आरोपी कडून 1 गावठी पिस्तूल व 4 जिवंत काडतुसे हस्तगत



पंकेश जाधव संपादक 7020794626

गुन्हे शाखा युनिट ३ पिंपरी चिंचवड शहर 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- आज दि. 19/03/2024 गुन्हे शाखा, युनिट 3 कडील पो हवा 479 सानप , पो शी.2877 मेरगळ ,पोशिं 1281 कोळेकर, पोशि 2001 नागरे, असे दिघी पोलीस स्टेशन हद्दीत पाहिजे फरारी आरोपीचा शोध घेत असताना पठारे वस्ती चारोलि येथे आले असता दिघी आळंदी वाहतुक शाखे कडील पोलीस उपनिरीक्षक राजीव रणदिवे, पोशि 2636 डूमनर , पोशि 2695 सावंत असे वाहतुक नियमन करित असताना गुन्हे शाखा युनिट 3 कडील मेरगळ यांना DY पाटील कॉलेज रोड ते पठारे वस्ती रोड बाजूकडे एक संशयित कार काळ्या काचा लावलेली स्विफ्ट कार नंबर MH 14 GH 2733 ही येताना दिसली असता सदर कार वाहतुक शाखे कडील व गुन्हे शाखा युनिट 3 कडील वरील नमूद पोलीस स्टाफ ने थांबून सदर कार मधील संशयित इसम नामे राजेंद्र शंकर खुरगे वय 32 वर्ष मूळ रा. लाखेवाडी इंदापूर ता.इंदापूर जिल्हा पुणे साध्या रा. वडमुखवाडी ता.हवेली जिल्हा पुणे

Advertisement

याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे जवळ एक देशी बनावटीचे पिस्तूल 4 जिवंत काडतुसे असे किंमत रु 54,000/- चा मुद्देमाल तसेच स्विफ्ट कार, मोबाईल असा एकूण 5,19,000/- रुपयाचा मुद्देमाल मिळून आला सदर इसमा विरुध्द दिघी पोलीस स्टेशन येथे आर्म ॲक्ट कलम 3,25, म.पो.कायदा कलम 37 (1) (3 ) सह 135 प्रमाणे दिघी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद केला आहे.

सदर कामगिरी ही गुन्हे शाखा युनिट 3 पिंपरी चिंचवड कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शैलेश गायकवाड साहेब व पोहवा. विठ्ठल सानप, पोलिस अंमलदार योगेश्वर कोळेकर, रामदास मेरगळ शशिकांत नांगरे,व दिघी आळंदी वाहतूक कडील पो. उपनि .रणदिवे सां , पोलिस अमलदार – दुमनर, सावंत यांनी केली आहे


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!