फाउंडेशन फॉर चाइल्ड प्रोटेक्शन – मुस्कान च्या “जागो” प्रकल्प अंतर्गत बाल लैंगिक अत्याचारा विरुद्धच्या कामगिरीबद्दल प्रेरणा संस्थे कडून मिळाली प्रशंसा. 


पंकेश जाधव संपादक 7020794626

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- फाउंडेशन फॉर चाइल्ड प्रोटेक्शन-मुस्कानचा “जागो” प्रकल्पा अंतर्गत समुदायात पुढाकार घेऊन बाल लैंगिक अत्याचार विरोधात सुरु असलेल्या उत्तम कामगिरीबद्दल पुण्यातील “प्रेरणा संस्था” जी बाल तस्करी आणि बाल शोषण या विषयांवर उल्लेखनीय कार्य करत आहे त्या संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून “जागो” प्रकल्पाचे भरभरून कौतुक करण्यात आले. ६ एप्रिल २०२४ रोजी झालेल्या भेटीमध्ये CSA संदर्भात शून्य सहिष्णुता वाढविण्यासाठी प्रकल्पातील प्रभावी उपक्रमांची प्रदर्शनी भरवण्यात आली.

समुदायातील नियोजित पॅरा-लिगल्स आणि पॅरा-कौन्सलर्स यांच्या माध्यमातून समुदायात CSA संदर्भात मालकी निर्माण करणे आणि CSA प्रकरणांवर विशेष लक्ष देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. स्वयंसेवक समुदायात कान आणि डोळ्यांचे कार्य करत आहेत व समुदायात CSA पिडीत बालकांना योग्य ते साहाय्य आणि सहकार्य करतात. त्याच बरोबर FFCP – मुस्कानच्या सामाजिक कार्यकर्त्यांना संबंधित माहितीसाठी मार्गदर्शन करतात.

बाल पंचायत सत्र, कटपुतळीचे कार्यक्रम, पथनाट्य आणि कॉर्नर मीटिंग, पुरुष बैठक यासारख्या सर्जनशील आणि बहुआयामी पद्धतींद्वारे, प्रोजेक्ट जागो समुदायांमध्ये प्रभावीपणे CSA प्रतिबंधाबद्दल जागरूकता पसरवत आहे. त्यात विविध उल्लेखनीय उपक्रमांच्या माध्यमातून बालकांमध्ये वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी पुस्तक पेटाऱ्याचा वापर आणि त्यांना सायबर शोषणाबद्दल शिक्षित करणे, तसेच असुरक्षित जागांचे सुरक्षित जागेत रूपांतर करण्यासाठी बालसुरक्षा घोषवाक्यांसह सामुदायिक भिंती चित्रे यांचा समावेश आहे.

Advertisement

“जागो” प्रकल्पाचे ध्येय स्पष्ट आहे, ते म्हणजे समुदायातील स्वयंसेवकांच्या CSA बाबत मानसिकतेत बदल घडवणे, CSA विरुद्धच्या लढ्यासाठी महिला, बालक, पालक, युवक, पुरुष यांना सक्षम करणे आहे. आपल्या बालकांची सुरक्षितता सर्वात महत्वाची आहे ही जाणीव अत्याचारा विरोधात लढण्यास समाजाला सक्षम बनवत आहे. त्याच सोबत वेताळ वस्तीसारख्या वस्तीतील बालकांना भेडसावणाऱ्या समस्यां विरोधात मदत मिळवण्यासाठी बालकांनी अगदी निर्भय पणे अधिकार्यांकडे जाण्याचा आणि आपले मत मांडण्याचा आत्मविश्वास मिळवला आहे.

प्रेरणा संस्थेच्या भेटीने CSA विरोधातील प्रयत्नांचे आणि बाल संरक्षण संदर्भातील उपक्रमांचे समाजात महत्व पटवून दिले आहे. सहभागींनी समुदायातील विविध उपक्रमांची तसेच बाल लैंगिक अत्याचाराला रोखण्याकरिता समाजाला सक्षम करणाऱ्या प्रकल्पाच्या प्रभावशाली धोरणांची प्रशंसा केली.

प्रकल्प “जागो” बालकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्या करिता सातत्याने कार्य करत आहे. बाल लैंगिक अत्याचाराविरुद्धच्या लढ्यात या प्रकल्पाने एक आशेचे किरण म्हणून काम केले आहे.

अधिक माहितीसाठी, कृपया खालील क्रमांकांवर संपर्क साधा: फाउंडेशन फॉर चाइल्ड प्रोटेक्शन – मुस्कान हेल्पलाइन: 9689062202/9112299785/9112299784


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!