गुन्हे शाखा युनिट २ व सहकारनगर पोलीस स्टेशनची उत्कृष्ट कामगिरी ! सहकारनगर पोलीस स्टेशन कडील दोन चोरीचे गुन्हे उघड
पंकेश जाधव संपादक 7020794626
गुन्हे शाखा युनिट २ व सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- मा. वरीष्ठ साो, यांचे आदेशान्वये आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने दिनांक २५/०४/२०२४ सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत युनिट-२ कडील पोलीस अमंलदार गजानन सोनुने व सहकारनगर पोलीस स्टेशन कडील महेश मंडलिक यांना बातमी मिळाली की, पीएमटी बस मध्ये मोबाईल चोऱ्या करणारा इसम हा शंकर महाराज मठाचे समोर श्रीहरी हॉटेलच्या बाहेर जिन्यालगत कोणाची तरी वाट पाहत थांबलेला आहे. लागलीच युनिट २ प्रभारी अधिकारी व सहकारनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुन्हे यांना सदर बातमीचा आशय सांगितला असता त्यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले असता युनिट २ कडील व सहकारनगर पोलीस स्टेशन कडील पोलीस स्टाफ यांनी दोन टिमा तयार करुन बातमीच्या ठिकाणी आडोशाला थांबलेला असता तेथे जावुन बातमी प्रमाणे संशयित इसम यास रात्रौ २२.३० वा. ताब्यात घेवुन त्यास नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव बिरबल राजेंद्र राय वय २७ वर्ष मुळ रा ग्राम बाबपुर पंचायत तीनपहाड आर एस साहेबगंज झारखंड सध्या पुणे फिरस्ता, असे सांगितले असता त्यास येथे थांबण्याचे प्रयोजन विचारले असता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांची अंगझडती घेतली असता एक आयफोन व आयटेल कंपनीचे दोन मोबाईल सापडले असता त्याबाबत सहकारनगर पोलीस स्टेशन कडील अभिलेखाची पाहणी केली असता सहकारनगर पोलीस स्टेशन गुरनं १३२/२०२४ भादवि क ३७९ व सहकारनगर पोलीस स्टेशन गुरनं १३३/२०२४ भादवि क ३७९ प्रमाणे असे ८०,०००/- रु मोबाईल चोरीचे दोन गुन्हे दाखल असल्याचे समजले. त्याबाबत त्याचेकडे चौकशी केली असता त्याने सदरचे मोबाईल पीएमटी बस मध्ये चोरल्याचे सांगितल्याने त्यास वरील दोन गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. दाखल गुन्हयांचा पुढील तपास सहकारनगर पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी करत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त श्री प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री शैलेश बलकवडे, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे, पोलीस उप आयुक्त परि-२ स्मार्तना पाटील, सहा. पो. आयुक्त गुन्हे-१ श्री सुनिल तांबे, सहा पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग नंदिनी वग्यानी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, श्री. नंदकुमार बिडवई, गुन्हे शाखा, युनिट-२, पुणे शहर, सहकारनगर पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, पोलीस निरीक्षक गुन्हे उत्तम भजनावळे, सहापोनिरी अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक महेश नलावडे, युवराज पोटरे, नितीन कांबळे, सहा.पो.उप. निरी. बापु खुटय, पोलीस अंमलदार, गजानन सोनुने, महेश मंडलिक, अमोल सरडे, शंकर नेवसे, साधना ताम्हाणे, पुष्पेंद्र चव्हाण, किरण कांबळे, अमोल पवार, सागर सुतकर, नवनाथ शिंदे, अमित पदमाळे, बजरंग पवार, सागर कुंभार, विशाल वाघ यांनी केलेली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

