काळेपडळ येथे झालेल्या वाहनाची तोडफोड करुन दहशत निर्माण करणाब आरोपीतांना हडपसर तपासपथकाकडून अटक
आकाश पांचाळ सह-संपादक
हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज़ ! ऑनलाईन पुणे :- दिनांक २४/०५/२०२४ रोजी सांयकाळी ०४/३० वाजण्याचे सुमारास फिर्यादी अमोल बाळासाहेब लोंढे वय १९ वर्षे रा. संकेत विहार काळेपडळ हडपसर पुणे हा त्याचा मित्र उमेश ससाणे याचेसह सय्यदनगर काळेपडळ हडपसर पुणे याठिकाणी टँकरद्वारे पाणी वाटप करित असताना उमेश ससाणे याचे ताब्यातील टँकरचा आरोपी चैतन्य सूर्यवंशी व आदित्य मोहोळकर याला धक्का लागल्याने झालेल्या वादातून आरोपीत यांनी रात्री ०२/०० वाजताचे सुमारास फिर्यादी राहत असलेल्या संकेत विहार काळेपडळ हडपसर पुणे तसेच प्रगती शाळेच्या मैदानाच्या बाजुला ससाणेनगर याठिकाणी त्यांचे इतर चार ते पाच अनोळखी इसमांनी दगड व हत्यारांच्या सहाय्याने सदर परिसरात पार्क केलेल्या कार, टेम्पो, रिक्षा अशा एकूण १५ ते २० वाहनांची तोडफोड करुन दहशत निर्माण केल्यावरुन हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर ८४१/२०२४ भा.द.वि. कलम १४३, १४४, १४५, १४८, १४९, ३३६, ४२७ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) (३) सह १३५ क्रिमीनल लॉ अॅमेन्डमॅन्ट अॅक्ट कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.
दाखल गुन्ह्याचे गांभिर्य ओळखून श्री. संतोष पांढरे, वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे व सुचनांप्रमाणे तपासपथक अधिकारी महेश कवळे, पोलीस उप निरीक्षक तसेच तपास पथक अंमलदार यांनी मिळून तपासाचे नियोजन केले. व घटनास्थळाचे आजुबाजुचे सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासून तोडफोड करणाऱ्या आरोपीतांचे नावे निष्पन्न करुन तांत्रिक विश्लेषणाच्या व गुप्त बातमीदाराच्या आधारे दिनांक- २४/०५/२०२४ रोजी पाहिजे आरोपी नामे १) प्रेम सुरेश सुरवसे वय १८ वर्षे रा. शिवतेजनगर काळेपडळ पुणे. २) रोहन समींदर कांबळे वय १८ वर्षे रा. सदर यांना हडपसर भागातून अटक करुन व विधीसंघर्षग्रस्त बालक यास ताब्यात घेण्यात आलेले आहे. तसेच अन्य पाहिजे आरोपीचे गुन्हे घडल्यापासून आपले अस्तित्व लपवुन फरार झालेले होते. त्यांचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेवून आरोपी नामे १) चैतन्य संपती सुर्यवंशी वय १८ वर्षे रा. रेल्वेगेट म्हसोबा मंदिराजवळ काळेपडळ हडपसर पुणे. २) रोहित शहाजी सुतार वय १८ वर्षे रा.सदर ३) प्रभाकर ऊर्फ राध्या सोमनाथ तोटे वय १८ वर्षे रा. सदर ४) आदित्य हनुमंत मोहोळकर वय १८ वर्षे रा. जोगेश्वरी कॉलनी काळेपडळ हडपसर पुणे यांना फुरसुंगी हडपसर पुणे येथून ताब्यात घेवुन दिनांक २६/०५/२०२४ रोजी अटक करण्यात आलेली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून गुन्हा करतेवेळी वापरलेले वाहन व हत्यारे जप्त करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास श्री नानासाहेब जाधव, सहा. पोलीस निरीक्षक हे करित आहेत.
सदरची कामगिरी ही श्री अमितेश कुमार, मा. पोलीस आयुक्त साो पुणे शहर, श्री. प्रविण पवार, मा. पोलीस सह आयुक्त साो. पुणे शहर, श्री. मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त साो, पुर्व प्रादेशिक विभाग व मा. आर राजा, पोलीस उप आयुक्त साो., परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. अश्विनी राख मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, संतोष पांढरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, मंगल मोढवे मॅडम, पोनि. (गुन्हे), यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, भगवान हंबर्डे, अजित मदने, अमोल दणके, चंद्रकांत रेजीतवाड, सचिन गोरखे, अमित साखरे, कुंडलीक केसकर, रामदास जाधव, अनिरुध्द सोनवणे, अमोल जाधव यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

