राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र.१, पुणे या पथकाची शिक्रापुर येथील अवैध गावठी दारु निर्मिती अड्डड्यावर धडक कारवाई.


पंकेश जाधव संपादक 7020794626

राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. १, पुणे

महा पोलिस न्यूज़ ! ऑनलाईन पुणे :– दि.१२/०६/२०२४ रोजी मा. विभागीय उपआयुक्त, पुणे विभाग श्री. सागर धोमकर सो, अधीक्षक – श्री. चरणसिंग राजपुत सो, उप-अधीक्षक श्री. सुजित पाटील सो, श्री. उत्तम शिंदे सो. व श्री. एस. बी. जगदाळे सो. यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र.१, पुणे या पथकाचे निरीक्षक श्री. देवदत्त पोटे यांचे पथकाने प्राप्त माहितीनुसार शिरुर तालुक्यातील शिक्रापुर गावातील वेळ नदीकाठी छापा टाकुन अवैधपणे गावठी दारुची निर्मिती करणाऱ्या अड्डड्यावर कारवाई करुन गावठी दारु निर्मितीसाठी लागणारे रसायन १३०० लि. व तयार गावठी दारु ७० लि. असा एकुण रु.५९,७००/- किंमतीचा दारुबंदी गुन्हयांतील मुद्देमाल जप्त केलेला असुन आरोपी इसम नामे अरमान कंकराज बिरावत, रा. शिक्रापुर, ता. शिरुर, जि. पुणे याचे विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

Advertisement

 

वरील कारवाई राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. १, पुणे पथकाचे निरीक्षक श्री. देवदत्त पोटे व दुय्यम निरीक्षक श्री. डी. एस. सुर्यवंशी तसेच जवान सर्वश्री सुरज घुले, जयराम काचरा, मुकुंद पोटे, शरद हांडगर, महिला जवान सौ. शाहिन इनामदार यांनी सहभाग घेतलेला आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक – श्री. देवदत्त नि. पोटे हे तपासी अंमलदार म्हणुन करीत आहेत. अवैध मद्य निर्मिती, विक्री बाबत कोणास माहिती मिळाल्यास तात्काळ राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभागाशी संपर्क साधावा असे जाहिर आवाहन करण्यात येत आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!